मिल्लीया महाविद्यालयात सेवा हक्क दिन उत्साहात साजरा
बीड: येथील मिल्लीया कला, विज्ञान व व्यवस्थापनशास्त्र, महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मंगळवार दिनांक २८ एप्रिल २०२६ रोजी सेवा हक्क दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद,कर्मचारी वृंद, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी व स्वयंसेवकांनी महाराष्ट्र सेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत पारदर्शकता, जबाबदारी आणि वेळेत सेवा देण्याबाबत शपथ घेतली.
विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र सेवा हक्क अधिनियम २०१५ वर आधारित ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. स्वयंसेवकांनी उत्साहाने सहभाग घेतला व या उपक्रमातून त्यांना नागरिकांच्या हक्का विषयी माहिती मिळाली. या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये सेवा हक्क कायद्याबाबत जागरूकता निर्माण करणे व जबाबदार नागरिक घडविणे हा होता.
कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रोफेसर हुसैनी एस.एस, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रोफेसर रमेश वारे, प्रा. शोएब पीरजादे, डॉ. शामल जाधव, प्राध्यापक वृंद,कर्मचारी वृंद, विद्यार्थी- विद्यार्थिनी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मोहम्मद इलियास फाजील यांचे मार्गदर्शन लाभले.


