एक मे ला मुस्लिम संरक्षणासाठी होणा-या आंदोलनामध्ये बहुसंख्येने हजर रहावे अल्पसंख्याक संरक्षण संघर्ष समितीच्या वतीने आवाहन
बीड प्रतिनिधि: देशात व राज्यात अल्पसंख्याक मुस्लिम बौद्ध सिख ईसाई जैन पारसी ज्यु समाजावर होणा-या अन्याय अत्याचार, मॉबलिचींग, हेटस्पिच, व अल्पसंख्याक मुस्लिम समाजाप्रती संवैधानिक पदावर बसुन बेताल वक्तव्य करणा-या नेत्यांविरोधात कडक कार्यवाही करावी.
व अल्पसंख्याक मुस्लिम समाजाचे संरक्षण करण्यासाठी जसे अनुसुचित जाती जमातीचे ॲटरासिटी ॲक्टद्वारे संरक्षण होते त्याच पध्दतीचे अल्पसंख्याक संरक्षण कायदा बनवून समाजाला सुरक्षा दयावी यासाठी महाराष्ट्र स्वतंत्रदिनी एक मे ला होणा-या आंदोलनाला बीड जिल्हा अधिकारी कार्यालयावर एक मे ला सकाळी साडे दहा वाजल्या पासुन सायंकाळी पाच वाजेपर्यंत एकदिवसीय लक्षणिक आंदोलन होणार आहे
या आंदोलनाला सर्वच राजकिय सामाजिक शिक्षक विदयार्थी संघटनांनी आपला पाठिंबा दर्शवलेला आहे धार्मिक गुरु यांनी दुवा देवून साथ देण्याचे आश्वासन दिले आहे. या आंदोलनाद्वारे केंद्र व राज्य शासनाला एक महिन्याचे अल्टीमेटम दिले जाणार आहे.
शासनाने आमच्या मागणीची दखल घ्यावी नसता बेमुदत उपोषणाला बसणार अशी माहिती अल्पसंख्याक संरक्षण संघर्ष समितीच्या वतीने ॲड. प्रा. इलियास इनामदार मुजतबा अहमद खान शेख मुसा सर ॲड. मोमीन अखील ॲड. शेख जेबा, खदीर शेख अखिल अन्ना हमिद पालेखान शेख ऐतेशाम शेख मैनूद्दीन सलीम खान डॉ. शेख मोहसिन आबेद कादरी सय्यद नबीलुज्जमा ॲड. जावेद मणियार पठाण खदीरुज्जमा मुशीर इनामदार पठाण अमरजान शामीर खान इमरान इनामदार शेख खदीर गुड्डू चाऊस हाफिज मोहम्मद अर्सलान यांनी प्रसिद्धी माध्यमाद्वारे केली आहे व जनतेला आवाहन आहे की बहुसंख्येने सहभागी व्हावे.


