मुस्लिम संरक्षण आंदोलनास हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा – नुमान चाऊस
समाज सेवक प्रा. इलियास इनामदार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन
माजलगाव :
मुस्लिम समाजाच्या विविध न्याय्य मागण्या व हक्कांसाठी एकदिवसीय लक्षनिक आंदोलनाचे आयोजन करण्यात आले असून, या आंदोलनास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मौलाना आझाद युवा मंचचे जिल्हाध्यक्ष नुमान अली चाऊस यांनी केले आहे. हे आंदोलन 1 मे रोजी सकाळी 10 ते सायं. 5 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे सकल मुस्लिम समाज व संरक्षण कृती समिती यांच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे. या आंदोलनाचे नेतृत्व प्रा. इलियास इनामदार करत आहेत.
प्रा. इलियास इनामदार यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजाच्या उन्नतीसाठी वाहिले असून, मुस्लिम आरक्षण, संरक्षण व विविध सामाजिक प्रश्नांवर त्यांनी सातत्याने काम केले आहे. या आंदोलनाचा उद्देश समाजाच्या प्रलंबित मागण्या व समस्या प्रशासनापर्यंत शांततामय मार्गाने पोहोचवणे हा आहे. “समाजाच्या हक्कांसाठी सर्वांनी एकजूट दाखवून मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,” असे आवाहन नुमान अली चाऊस यांनी केले आहे.


