एशिया न्यूज बीड

मिलिया हायस्कूल, धारूर येथे विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण; नवीन शैक्षणिक वर्षाचे उत्साहात स्वागत

धारूर : आज सोमवार, दि. 15/06/2026 रोजी मिलिया हायस्कूल, धारूर येथे इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमात संस्थेचे मार्गदर्शक व लोकप्रिय व्यक्तिमत्त्व श्री. शेख अजीमभाई, श्री. पठाण रियाज खान, मिलिया प्राथमिक शाळा धारूरचे मुख्याध्यापक श्री. सय्यद जावेद अली तसेच शाळेतील वरिष्ठ शिक्षक यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले.

नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी शाळेत दाखल झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. या आनंददायी व प्रेरणादायी वातावरणात विद्यार्थ्यांनी नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात केली.

यावेळी विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून नवीन वर्षात चांगल्या शिक्षणाचा संकल्प करण्यात आला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *