एशिया न्यूज बीड

नाजिया इलाही विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी; अल्पसंख्याक संरक्षण कायद्याचीही जोरदार मागणी पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर; विविध सामाजिक संघटना, विधिज्ञ व कार्यकर्त्यांची उपस्थिती

नाजिया इलाही विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी; अल्पसंख्याक संरक्षण कायद्याचीही जोरदार मागणी  पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर; विविध सामाजिक संघटना, विधिज्ञ व कार्यकर्त्यांची उपस्थिती

 

नाजिया इलाही विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी; अल्पसंख्याक संरक्षण कायद्याचीही जोरदार मागणी

पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर; विविध सामाजिक संघटना, विधिज्ञ व कार्यकर्त्यांची उपस्थिती

 

बीड | प्रतिनिधी भाजप कार्यकर्त्या नाजिया इलाही खान यांनी एका मुलाखतीदरम्यान इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) तसेच हजरत आयेशा (रज़ि.) यांच्याविषयी कथितरीत्या आक्षेपार्ह वक्तव्य करून मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याने या प्रकरणी भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार त्यांच्याविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी विविध सामाजिक संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षक, बीड यांना निवेदनाद्वारे केली. ॲड. आसमा पटेल, यलगार ग्रुपचे संस्थापक बिलाल अब्दुल रज्जाक शेख शहेबाज़ कादरी सय्यद इनाम यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, विधिज्ञ व समाजसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    यावेळी अल्पसंख्याक संरक्षण संघर्ष समितीच्या वतीने ॲड. इलियास इनामदार यांनी राज्यात स्वतंत्र अल्पसंख्याक संरक्षण कायदा तातडीने तयार करून लागू करण्याची मागणी केली. धार्मिक भावना दुखावणारी वक्तव्ये, द्वेषपूर्ण प्रचार आणि अल्पसंख्याक समाजावरील वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी प्रभावी व स्वतंत्र कायद्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले.

निवेदनात अशा प्रकारच्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली असून, भविष्यात कोणत्याही धर्माविषयी आक्षेपार्ह विधाने होऊ नयेत यासाठी तातडीने एफआयआर नोंदवून निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

      निवेदन स्वीकारल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. बल्लाड यांना आवश्यक कार्यवाहीचे निर्देश दिले. मात्र, वृत्त लिहिपर्यंत या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला नव्हता. यावेळी ॲड. आसिमा पटेल, ॲड. नासेर पटेल, ॲड. मोमीन अखील, ॲड. इलियास इनामदार, शेख बिलाल, शेख एहतेशाम, शहबाज कादरी, अम्रपाली साबळे अरफात खान,सय्यद सलमान, खदीरूजमा खान, शेख मैनुद्दीन, सय्यद इनाम तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजसेवक व महिला पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *