एशिया न्यूज बीड

जोशीज् मॅथ्स क्लासेसमध्ये “विद्यार्थ्यांचे कौतुकायन “, “कॉम्रेड मॅरेथॉन रनर्स चा गौरव समारंभ” व अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन सेमिनार उत्साहात संपन्न

जोशीज् मॅथ्स क्लासेसमध्ये “विद्यार्थ्यांचे कौतुकायन “, “कॉम्रेड मॅरेथॉन रनर्स चा गौरव समारंभ” व अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन सेमिनार उत्साहात संपन्न

जोशीज् मॅथ्स क्लासेसमध्ये “विद्यार्थ्यांचे कौतुकायन “, “कॉम्रेड मॅरेथॉन रनर्स चा गौरव समारंभ” व अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन सेमिनार उत्साहात संपन्न

 

बीड, दि. २६ :

जोशीज् मॅथ्स क्लासेस, उमाकिरण एज्युकेशनल संकुल, आदर्श नगर, बीड येथे आयोजित “कौतुकायन २०२६”, “गौरव समारंभ” आणि प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन सेमिनार हे तीनही कार्यक्रम विद्यार्थी, पालक, मान्यवर आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपप्रज्वलन करून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. प्रा. सुनील जोशी यांनी प्रास्ताविकातून विद्यार्थ्यांच्या यशामागील सातत्यपूर्ण मेहनत, योग्य मार्गदर्शन आणि पालकांच्या सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले.

कॉम्रेड्स मॅरेथॉन वीरांचा गौरव

दक्षिण आफ्रिकेत पार पडलेल्या जगप्रसिद्ध कॉम्रेड्स मॅरेथॉन (८७ कि.मी.) स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण करून बीड जिल्ह्याचा आणि देशाचा गौरव वाढविणाऱ्या सात धावपटूंचा विशेष सत्कार करण्यात आला.

यामध्ये श्री शरद खिल्लारे सर,

मेजर प्रभाकर जाधव सर, श्री कल्याण कुलकर्णी सर, श्री हरी ठोंबरे सर, डॉ. अमोल मोराळे सर या सर्वांनी विद्यार्थ्यांना जिद्द, शिस्त, सातत्य आणि ध्येयपूर्तीचा प्रेरणादायी संदेश दिला.

“कौतुकायन २०२६” अंतर्गत गुणवंतांचा गौरव

जेईई मेन, जेईई अॅडव्हान्स्ड, एमएचटी-सीईटी, महाराष्ट्र राज्य मंडळ (एचएससी), व्हीआयटीईई तसेच इतर स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचाही गौरव करण्यात आला.

विशेषतः २०२६ मध्ये विविध परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या मोहम्मद अस्लम, प्रशांत लोणकर, प्रतिक कंठक, श्रीकांत खराडे, जयदीप जानवळे, धसे रुग्वेद, मयुरेश जोशी, धनंजय माने, अभिषेक आमटे, करण कांगडे, वैभवी थिगळे, अंकिता काळे, धस आदित्य, अमर कदम, जिशान पटेल, कृपा मंत्री, अभिनव वाघमारे, आदिती शिंदे, यश सौंदलकर, सुमित सोनवणे, तन्मय बोंडगे, शेख शाद, संस्कार काजळे, वैष्णवी कोल्हे, शरयू गिरे, सांची कांबळे, सचिन जगदाळे,प्राप्ती खरात, सुमित सोनवणे, पूनम गावडे, प्रतिक पवार, मिर्झा अफीफ मन्सूर, सचिन जगदाळे, नवनाथ डिसले, ओंकार शेजूळ आणि महेश डिसले यांचा पालकांसह विशेष सत्कार करण्यात आला.

प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन सेमिनार

यानंतर आयोजित प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन सेमिनारमध्ये प्रा. सुनील जोशी यांनी इंजिनिअरिंग, फार्मसी, कृषी, आर्किटेक्चर तसेच इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

यामध्ये —एमएचटी-सीईटी कॅप प्रवेश प्रक्रिया,नोंदणी व कागदपत्र पडताळणी,मेरिट लिस्ट व कट-ऑफ

ऑप्शन फॉर्म भरण्याची रणनीती, कॉलेज निवड,शिष्यवृत्ती व शिक्षण कर्ज, करिअर संधी, याबाबत सखोल माहिती देण्यात आली. उपस्थित विद्यार्थी व पालकांनी सेमिनारला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

मान्यवरांची उपस्थिती

कार्यक्रमास रोटरी क्लब ऑफ बीडचे अध्यक्ष रो. विकास उमापूरकर, सचिव रो. सुमित जयस्वाल, निर्वाचित अध्यक्ष रो. सीए श्रीगोपाल लड्डा आणि निर्वाचित सचिव रो. सुहास बेदरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. सुनील जोशी यांनी उपस्थित सर्व मान्यवर, विद्यार्थी, पालक व सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.

“योग्य मार्गदर्शन, कठोर परिश्रम आणि सातत्य यांच्या बळावर प्रत्येक विद्यार्थी आपल्या स्वप्नातील करिअर निश्चित घडवू शकतो,” असा विश्वास प्रा. सुनील जोशी यांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *