*जिंतूर आर टी एस ए स्केटिंग एरिनाच्या 70 मीटर स्पर्धेचे बक्षीस वितरण
जिंतूर आर टी एस ए स्केटिंग एरिनाच्या 70 मीटर स्पर्धेचे बक्षीस वितरण*
*जिंतूर | प्रतिनिधी* गजानन डहाके
जिंतूर शहरातील आर टी एस ए स्केटिंग एरिनाच्या वतीने आयोजित 70 मीटर स्केटिंग स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ दि. 22 जुलै 2026 रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष *डॉ. पंडित दराडे* आणि तालुका क्रीडा मार्गदर्शक *श्री. शाहरुख जानेमिया पवार* हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते स्पर्धेत विजेते ठरलेल्या खेळाडूंना रोख बक्षीस, देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. दराडे म्हणाले, “खेळामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. व खेळातूनच व्यक्तिमत्व घडते शासनाबरोबरच स्थानिक संस्थांनीही खेळांना प्रोत्साहन दिले पाहिजे.”
तालुका क्रीडा मार्गदर्शक शाहरुख पवार यांनी खेळाडूंना शिस्त, मेहनत आणि सातत्य ठेवण्याचा सल्ला दिला.
तसेच स्केटिंग कोच पुष्कर डहाके यांनी जिंतूर मध्ये अशी स्केटिंग अकॅडमी चालू केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले
कार्यक्रमाची सुरुवात *सोनिया अच्छा मॅडम* यांच्या प्रास्ताविकाने झाली. सूत्रसंचालन प्रशिक्षकांनी केले. आभार प्रदर्शन लोकशाही पत्रकार संघ जिंतूरचे कार्याध्यक्ष *डॉ. गजानन डहाके पाटील* यांनी केले.
या वेळी मोठ्या संख्येने खेळाडूंचे पालक, विद्यार्थी व क्रीडा रसिक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी RTS ए स्केटिंग एरिनाचे सर्व पदाधिकारी व प्रशिक्षक यांनी परिश्रम घेतले


