एशिया न्यूज बीड

लोकनेते विनायकराव मेटे यांच्या जयंतीनिमित्त ३० जून रोजी सामुदायिक अभिवादन; राज्यभर विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

बीड, प्रतिनिधी : दिवंगत लोकनेते विनायकराव मेटे यांच्या जयंतीनिमित्त मंगळवार, दि. ३० जून रोजी सकाळी १० वाजता बीड येथील कॅनॉल रोडवरील लोकनेते विनायकराव मेटे स्मृतीस्थळी सामुदायिक अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास मेटे साहेबांचे असंख्य चाहते, कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

लोकनेते विनायकराव मेटे यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्याची परंपरा कायम ठेवत यंदाही महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धन, शैक्षणिक साहित्य वाटप आणि लेक लाडकी अभियान आदी सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. ज्योती विनायकराव मेटे यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपक्रम राबविण्यात येणार असून, मेटे साहेबांच्या सामाजिक कार्याचा आणि विचारांचा वारसा अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

जयंतीदिनी सकाळी १० वाजता स्मृतीस्थळी सामुदायिक अभिवादन करण्यात येणार असून, सर्व कार्यकर्ते, हितचिंतक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लोकनेते विनायकराव मेटे यांना अभिवादन करावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *