एशिया न्यूज बीड

राष्ट्रीय कर्तव्य म्हणून मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी बी एल ओ यांना सहकार्य करा :- अनिल बोर्डे 

राष्ट्रीय कर्तव्य म्हणून मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी बी एल ओ यांना सहकार्य करा :- अनिल बोर्डे 

राष्ट्रीय कर्तव्य म्हणून मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी बी एल ओ यांना सहकार्य करा :- अनिल बोर्डे 

गेवराई (प्रतिनिधी) भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू झालेल्या ‘ विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमे ‘ अंतर्गत मतदार यादीची पडताळणी प्रक्रिया दिनांक 29 जुलै 2026 पर्यंत सुरू राहणार आहे. या प्रक्रियेत पात्र नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यासाठी गणना प्रपत्र (Enumeration Form ) भरून द्यावे.

 बोर्डे म्हणाले, ” मतदान हा आपला घटनात्मक अधिकार आणि राष्ट्रीय कर्तव्य आहे. अनेकांची नावे मतदार यादीतून सुटले असते. त्यामुळे बी एल ओ म्हणजेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी येऊन पडताळणी करणार आहेत “.

 तरी सर्व मतदारांनी बीएलओ यांना पुढील माहिती व कागदपत्रे उपलब्ध करून सहकार्य करावे.

1) मतदाराचा अलीकडील पासपोर्ट आकाराचा रंगीत छायाचित्र.

2) मतदाराची जन्मतारीख.

3) आधार क्रमांक,EPIC( मतदार ओळखपत्र ) क्रमांक व मोबाईल क्रमांक.

4) मतदाराच्या वडीलाचे नाव, आईचे नाव, पती-पत्नीचे नाव तसेच संबंधिताचे EPIC क्रमांक (लागू असल्यास )

BLO यांच्याकडून Enumeration Form (EF) गणना प्रपत्र दोन प्रतीमध्ये उपलब्ध करून देण्यात येईल. सदर गणना पत्रकावरील सर्व माहिती काळजीपूर्वक तपासून त्यावर प्रौढ सदस्यांची स्वाक्षरी करून एक प्रत जतन करावी व दुसरी प्रत बीएलओ यांच्याकडे जमा करावी. दिनांक 29.7.2026 पर्यंत Enumeration Form भरून न देणाऱ्या मतदाराचा सामावेश मतदार यादीत होणार नाही, याची मतदाराने गंभीर्याने नोंद घ्यावी. तरी सर्व मतदाराने आपल्या गावातील BLO यांना आवश्यक ती माहिती व कागदपत्रे वेळेत उपलब्ध करून देऊन मतदार यादी विशेष पुनरीक्षण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे.

  लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान हक्क बजावणे अत्यंत आवश्यक आहे. एकही पात्र मतदार यादीतून वंचित राहू नये. ही मोहीम लोकशाहीची पायाभरणी आहे. तरी जिल्ह्यातील सर्व मतदारांनी व नागरिकांनी पुढे येऊन सहभाग नोंदवावा असे आवाहन बीड जिल्हा ग्राहक पंचायत जिल्हा उपाध्यक्ष अनिल बोर्डे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *