मिल्लिया महाविद्यालयाच्या करिअर संसदेचा एकदिवसीय कार्यशाळेत सहभाग
बीड: महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र व सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालयात छत्रपती संभाजीनगर येथे शुक्रवार दिनांक २४ जुलै २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या विभागीय एकदिवसीय कार्यशाळेत मिल्लिया कला विज्ञान व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयाच्या करिअर संस्थेने उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांच्या करिअर विकासाला चालना देणे, रोजगाराच्या नव्या संधींची माहिती उपलब्ध करून देणे तसेच कौशल्य विकासाचे महत्त्व पटवून देणे हा कार्यशाळेचा प्रमुख उद्देश होता.
या कार्यशाळेत विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांनी करिअर नियोजन, व्यक्तिमत्त्व विकास,संवाद कौशल्य, मुलाखत तंत्र, रोजगाराच्या संधी व बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगातील आवश्यक कौशल्ये याविषयी मार्गदर्शन केले. सहभागी विद्यार्थ्यांनी तज्ज्ञांशी संवाद साधत आपल्या शंकांचे निरसन केले.
मिल्लिया महाविद्यालयाच्या करिअर संसदेच्या प्रतिनिधींनी कार्यशाळेत सक्रिय सहभाग घेत विविध उपक्रमांमध्ये योगदान दिले. या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना करिअरविषयक नव्या संधींची माहिती मिळाली असून भविष्यातील वाटचालीसाठी आवश्यक मार्गदर्शन लाभल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
या कार्यशाळेत महाविद्यालयाचा करिअर संसदेचा मुख्यमंत्री सय्यद रेहान अली खालेद अली यांचा सत्कार करण्यात आला तसेच यामध्ये विद्यार्थी रेहान आली, मोमीन अय्यान मोहम्मद इरफान, मोमीन आयान मोहम्मद बहाउद्दीन, सय्यद मुशायद मुस्तकीम तसेच विद्यार्थिनी सय्यद मुस्कान आजम, शेख फातिमा युसूफ, सय्यद आयशा सय्यद आजम, शेख सदाफ एजाज, शेख सानिया फारूख, शेख फातिमा इम्तियाज, अलवान फाईजा रिजवान, सय्यद शिफा सय्यद मन्सूर यांची उपस्थिती होते.
कार्यशाळेस महाविद्यालयाचे करियर कट्टटा तालुका समन्वयक डॉ.मोहम्मद आसेफ इकबाल, महाविद्यालयीन समन्वयक डॉ.शेख हुसेन इमाम, डॉ.शामल जाधव यांची उपस्थिती होती.
प्रशासनाचे तसेच उपस्थित मान्यवरांचे सहभागी विद्यार्थ्यांनी आभार मानले.कार्यशाळा सहभागासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहम्मद इलयास फाजील यांचे मार्गदर्शन लाभले.


