एशिया न्यूज बीड

मिल्लीया गर्ल्स माध्यमिक शाळेच्या दहा विद्यार्थिनींची उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्तापूर्ण कामगिरी!* 

मिल्लीया गर्ल्स माध्यमिक शाळेच्या दहा विद्यार्थिनींची उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्तापूर्ण कामगिरी!* 

*मिल्लीया गर्ल्स माध्यमिक शाळेच्या दहा विद्यार्थिनींची उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्तापूर्ण कामगिरी!* 

बीड ( प्रतिनिधी)

शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने उत्कृष्ट यश संपादन करणाऱ्या बीड येथील मिल्लीया गर्लस माध्यमिक शाळेने पुन्हा एकदा आपल्या उज्ज्वल परंपरेची पुनरावृत्ती केली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत( 7वी ) शाळेच्या दहा होतकरू विद्यार्थिनींनी घवघवीत यश संपादन करत शिष्यवृत्ती परिक्षेत पात्र ठरल्या आहे. या विद्यार्थिनींच्या दैदिप्यमान यशाने शाळा आणि पालकात आनंदाचे वातावरण पसरले आहे. शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी झालेल्‍या विद्यार्थिनींची नावे 1-मोमीन अशमीरा अकबर 2- अल्फीया अमजद शेख 3-सय्यद आलिया मुदस्सीर 4-माहीन सोहेल शेख 5-खादरी मरियम फातिमा सय्यद गाजी 6-शेख सहर फातिमा अझहर 7-शाजीन खान अय्युब खान 8-शेख उमेमा कशफ मोहम्मद झहीरोद्दीन 9-उम्मे हानी रिजवान काजी 10 इनामदार जुनेरा अल्ताफ विद्यार्थिनींच्या या कष्टाळू आणि उल्लेखनीय कामगिरीबद्दल मिल्लीया गर्लस माध्यमिक शाळेच्या सर्व-संबंधित मान्यवरांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. तसेच त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. यात डॉ सलीम बिन मेहफूज (अध्यक्ष) खान सबीहा बाजी (सचिव) डॉ. समीर (जॉइंट सेक्रेटरी) डॉ सिद्दिकी मोहम्मद इरफ़ान सादुल्लाह (मुख्याध्यापक). उपमुख्याध्यापक खुर्शीद अहमद सुपरवायझर नसरीन फरहाना व समस्त शिक्षक व शिक्षिकेनेही व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही खूप खूप शुभेच्छा दिल्या. विद्यार्थिनींच्या या यशामागे शाळा व्यवस्थापन समिती, मार्गदर्शक शिक्षक आणि पालकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले. या यशाबद्दल सर्व स्तरातून यशस्वी विद्यार्थिनींवर अभिनव शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *