मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२६ : साठी मतदार नोंदणी करा – *कादरी शाहेद*
औरंगाबाद, दि
. १६ ऑक्टोबर २०२५ –
आगामी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या २०२६ च्या निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला असून, या पार्श्वभूमीवर पदवीधरांसाठी मतदार नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली आहे.
सुशिक्षित वर्गाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या निवडणुकीत सहभागासाठी नवीन मतदार नोंदणी करणे अत्यावश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
मतदार नोंदणीसाठी पात्र असलेल्या सर्व पदवीधरांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेचा पुरावा, निवासाचा पुरावा आणि पासपोर्ट आकाराचा फोटो सादर करणे आवश्यक आहे. ऑनलाईन तसेच प्रत्यक्ष अर्ज आपल्या तेहसील कार्यल्यात स्वीकारले जाणार आहेत.
या निमित्ताने संघटनेचे सर्व पदाधिकारी यांच्या पुढाकाराने विशेष मतदार नोंदणी अभियान हाती घेण्यात आले आहे.
या अभियानाचा उद्देश म्हणजे सुशिक्षित, विचारशील आणि जबाबदार नागरिकांना मतदान प्रक्रियेत सक्रियपणे सहभागी करून घेणे, असे क्रांतिकारी शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्यचे संथापक सचिव कादरी शाहेद यांनी सांगितले.
संघटनेच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या आवाहनात म्हटले आहे की,
> “आपण शिक्षणाने सक्षम, विचारशील आणि समाजासाठी जबाबदार आहोत. मतदान हा फक्त अधिकार नाही, तर समाजाच्या भविष्याचा पाया आहे. प्रत्येक मताचा निर्णय आपल्या गावाचे, शहराचे आणि कुटुंबाचे भवितव्य ठरवू शकतो. आज आपल्या मतातूनच प्रामाणिक नेतृत्व, पारदर्शक प्रशासन आणि न्याय्य समाजव्यवस्था घडवता येईल.”
तसेच नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की,
> “आपली नोंदणी करून समाजाच्या विकासात हातभार लावा. शिक्षित समाजाच्या ताकदीचे दर्शन घडवा आणि आपल्या हक्काचा उपयोग करून लोकशाही मजबूत करा.”
आगामी काही आठवड्यांत विविध महाविद्यालये, शैक्षणिक संस्था आणि स्वयंसेवी संघटनांच्या माध्यमातून जनजागृती उपक्रम राबवले जाणार आहेत.
प्रशासनाने पदवीधरांना वेळेत नोंदणी करून आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करण्याचे आवाहन केले आहे. तसेंच संघटनेवे इतर पदाधिकारी शाफी सर,अय्युब सर ,गायकवाड सर, आसरार सर,पवार सर,पटेल सर, सगीर सर,मुबीन सर,राजू सर यांच्याशी संपर्क साधावा.


