- *शिर्डीतील राज्य शालेय क्रिकेट निवड स्पर्धेत बीडचा शौर्य*
- *शौर्य शैलेश जाधवची महाराष्ट्र संघात भक्कम निवड**
बीड : महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांच्या वतीने आयोजित राज्य शालेय क्रिकेट (U-17) मुलें निवड स्पर्धा सन 2024-25 चे शिर्डी येथे यशस्वी आयोजन करण्यात आले. राज्यातील जवळपास सर्व जिल्ह्यांतील शाळांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या स्पर्धेमध्ये राज्यभरातील हजारो प्रतिभावान खेळाडूंच्या दमदार कामगिरीतून 70 ते 80 उत्कृष्ट खेळाडू यांची पुढील निवड चाचणीसाठी निवड करण्यात आली. कठोर निवड प्रक्रियेनंतर महाराष्ट्र राज्य शालेय क्रिकेट संघासाठी केवळ 16 मुलांची अंतिम निवड करण्यात आली.
या 16 राज्यस्तरीय निवडीतील मुलांत बीड जिल्ह्याचा शौर्य शैलेश जाधव याने आपली विजयी मजल मारत राज्य संघात स्थान पटकावले आहे. आपल्या उत्कृष्ट तंत्र, सातत्यपूर्ण सराव आणि प्रभावी खेळाच्या जोरावर शौर्यने राज्य निवड समितीचे लक्ष वेधून घेत सर्वोत्कृष्टांमध्ये स्थान मिळवले.
शौर्यच्या या कामगिरीमुळे बीड जिल्ह्यात आनंदाचे वातावरण असून त्याचे प्रशिक्षक, पालक, शाळा, तसेच जिल्ह्यातील क्रीडाप्रेमी यांच्याकडून शौर्य जाधववर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या आधी देखील शौर्याची ऊ-14 महाराष्ट्र राज्य शालेय क्रिकेट संघात निवड झाली होती तसेच गत वर्षी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेत तो U-14 महाराष्ट्र संघाकडून खेळला आसून कमी वयात यावेळेस U-17 राज्य संघातून खेळण्याची संधी मिळाल्यामुळे त्याच्या कारकिर्दीसाठी नवे दालन खुले झाले आहे.
बीड जिल्ह्याच्या क्रिकेट आसोसेशन, आदर्श क्लब तसेच बीड जिल्हा क्रिकेट वकील संघ आणि फ्रेंड्स स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने शौर्य शैलेश जाधवचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील स्पर्धांसाठी हार्दिक शुभेच्छा दिली आहे


