एशिया न्यूज बीड

गेवराई नगर परिषद निवडणुकीत दोन गटांत तणाव; 21 जणांवर गुन्हा दाखल समाजमाध्यमांवरील तेढ निर्माण करणाऱ्या कृत्यांवर पोलिसांची कडक नजर मतमोजणीदरम्यान कायदा बिघडविणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार _पोलीस अधीक्षक

गेवराई नगर परिषद निवडणुकीत दोन गटांत तणाव; 21 जणांवर गुन्हा दाखल  समाजमाध्यमांवरील तेढ निर्माण करणाऱ्या कृत्यांवर पोलिसांची कडक नजर  मतमोजणीदरम्यान कायदा बिघडविणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार _पोलीस अधीक्षक

गेवराई नगर परिषद निवडणुकीत दोन गटांत तणाव; 21 जणांवर गुन्हा दाखल

समाजमाध्यमांवरील तेढ निर्माण करणाऱ्या कृत्यांवर पोलिसांची कडक नजर

  • मतमोजणीदरम्यान कायदा बिघडविणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार _पोलीस अधीक्षक

गेवराई प्रतिनिधी

दि. 02 डिसेंबर 2025 रोजी पार पडलेल्या गेवराई नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या मतदान प्रक्रियेदरम्यान प्रभाग क्र. 10, जिल्हा परिषद उर्दू शाळेजवळ दोन गटांमध्ये किरकोळ वाद झाला. हा वाद पुढे वाढत जात गैरकायदेशीर मंडळी जमवून दोन्ही गटांनी परस्पर मारहाण व शिवीगाळ केल्याचा गंभीर प्रकार घडला या घटनेच्या प्रत्युत्तरादाखल एका गटातील कार्यकर्त्यांनी कृष्णाई बंगल्याच्या कंपाऊंडमध्ये प्रवेश करून तेथे उपस्थित असलेल्या व्यक्तींवर हल्ला केला. त्यानंतर दुसऱ्या गटाने जिल्हा परिषद मुलांची शाळा, कोल्हेर रोड येथे धाव घेऊन पुन्हा वाद घातला तसेच परस्पर दगडफेक करून एका चारचाकी वाहनाच्या काचा फोडल्या.या सर्व प्रकाराविषयी पोलीस ठाणे, गेवराई येथे दाखल झालेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजि. नं. 712/2025 अन्वये कलम 223, 189(2) व इतर बी.एन.एस.-2023 प्रमाणे एकूण 21 आरोपी व 20 ते 30 अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

 

तपासादरम्यान आतापर्यंत 17 आरोपींना अटक करून नोटीसवर सोडण्यात आले असून घटनास्थळावरील CCTV फुटेज तसेच सोशल मीडियावर प्रसारित झालेले व्हिडिओ तपासण्यात आले आहेत. सदर पुराव्यांवरून अजून 20 आरोपींची पूर्ण ओळख पटली असून त्यांचा शोध घेऊन लवकरच अटक करून कायदेशीर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.अटकेत असलेल्या आरोपींची कसून चौकशी करण्यात आली असून सर्व आरोपींना मा. विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा अपर पोलीस अधीक्षक, बीड यांच्या समक्ष हजर करून चांगल्या वर्तनाचे तसेच मोठ्या रक्कमेचे बंधपत्र घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील काळात संबंधित आरोपी कोणतेही बेकायदेशीर कृत्य केल्यास त्यांच्यावर मोठ्या रकमेचा दंड आकारण्यात येईल किंवा त्यांना कारावासाची शिक्षा भोगावी लागेल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.आगामी मतमोजणीदरम्यान कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कडक कारवाई करून त्यांना तडीपार करण्याचे निर्देश नवनीत कॉवत, पोलीस अधीक्षक, बीड यांनी दिले आहेत.बीड पोलीस दल व पोलीस ठाणे गेवराई यांच्या वतीने शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, नमूद घटनांच्या पार्श्वभूमीवर राजकीय, सामाजिक, धार्मिक किंवा जातीय तेढ निर्माण करणाऱ्या कोणत्याही पोस्ट किंवा वक्तव्यांपासून दूर राहावे. समाजमाध्यमांवरील अशा समाजविघातक कृत्यावर सायबर पथक व पोलिसांकडून सतत लक्ष ठेवले जात असून दोषींवर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *