नवनिर्वाचित नगराध्यक्षा श्रीमती प्रेमलताताई पारवे यांच्या पदग्रहण सोहळ्यानिमित्त उपस्थित राहून त्यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवकांना शुभेच्छा दिल्या…!
बीड नगर परिषद निवडणुकीत शहरातील मतदार बंधु – भगिनींनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. अजितदादा पवार साहेब यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास ठेऊन शहरात काम करण्याची संधी दिली आहे. त्यामुळे राजकीय टिका – टिप्पणी टाळून आजवर काय झाले ? यावर चर्चा करण्यापेक्षा शहरातील नागरीकांना शाश्वत विकासाची हमी देऊन त्यांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करूयात, असा विश्वास यानिमित्ताने व्यक्त केला. शहरातील नागरीकांना रस्ते, स्वच्छता, पाणीपुरवठा, विज या मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्वांनी सामुहिक प्रयत्न करण्याच्या सूचना यानिमित्ताने दिल्या.
शहराच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना, शिवसंग्राम यांसह मित्रपक्षाच्या निवडणुकपूर्व युतीला आता एमआयएम व काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी पाठिंबा देऊन शिव, शाहु, फुले, आंबेडकर व मौलाना आझाद बीड शहर विकास आघाडीमध्ये सहभाग नोंदविला आहे, त्यांचे याप्रसंगी स्वागत करून आभार व्यक्त केले.
याप्रसंगी महायुतीचे शहरातील सर्व पदाधिकारी, नवनिर्वाचित नगरसेवक, मुख्याधिकारी, नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महायुतीचे कार्यकर्ते आणि शहरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


