हाफ़ीज़ ए क़ुरआन कडून एस.एम.युसूफ़ यांचा सत्कार
समाजातील प्रत्येक प्रश्नावर सदैव परखड लिखाण करा – हाफ़ीज़ मंसूर
बीड (प्रतिनिधी) – शहरातील मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी पत्रकारिता क्षेत्रात बारा वर्षे (एक तप) पूर्ण केल्याबद्दल त्यांचा हाफ़ीज़ ए कुरआन मन्सूर साहब यांनी शाल, पुष्पहाराने हृदयी सत्कार केला. यावेळी फॅन्सी कलेक्शनचे संचालक शेख फ़ानूस, बाबुभाई आणि आऊटफिट टेलरिंग शॉप चे संचालक सय्यद जुबेर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना हाफ़ीज़ मन्सूर म्हणाले, गेल्या १२ वर्षांपासून आपल्याकडून सुरू असलेली निष्पक्ष, निर्भीड, परखड पत्रकारिता यापुढेही समाजातील प्रत्येक घटकासाठी, प्रश्नांसाठी सदैव अशीच चालू राहू द्यावी. अल्लाह आपल्याला सदैव निरोगी, तंदुरुस्त ठेवो. अशी कामना केली. एस.एम.युसूफ़ म्हणाले, पत्रकारिता क्षेत्रात एक तप पूर्ण केल्यानंतर पहिलाच सत्कार एका हाफ़ीज़ ए कुरआन कडून होतोय, हा माझ्यासाठी निश्चितपणे मोठा भाग्याचा क्षण आहे


