ज्युनिअर महाराष्ट्र श्री २०२६ राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा
बीड:
आय बी बी एफ महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशन. मुंबई यांचे मान्यतेने व अहिल्या नगर असोसिएशन ऑफ बॉडी बिल्डिंग अँड फिजीक स्पोर्ट्स यांच्या विदयमाने “ज्युनिअर महाराष्ट्र श्री” २०२६ व ( मास्टर्स / दिव्यांग )आणि ज्युनिअर महाराष्ट्र श्री स्पर्धे चे आयोजन शनिवार दि. ३१ जानेवारी २०२६ रोजी सांयकाळी ५ वाजता विठठला लान्स राहुरी जिल्हा अहिल्या नगर येथे करण्यात आलेले आहे या स्पर्धेकरिता बीड जिल्हा ज्युनियर, मास्टर्स, दिव्यांग शरीर सौष्ठव चाचणी स्पर्धेचे आयोजन रविवार १८ जानेवारी रोजी सायः ६ः३० वाजता मराठवाडा बॉडी बिल्डर्स असोसिएशन व बीड जिल्हा असोसिएशन, लाईफ हेल्थ क्लब लाईफ स्टाईल जिम महात्मा फुले शॉपिंग सेंटर,नवी भाजी मंडई बीड येथे आयोजित करण्यात आलेली आहे तरी जिल्ह्यातील इच्छुक स्पर्धकांनी सहभागी व्हावे असे आवाहन मराठवाडा बॉडी बिल्डर्स असोसिएशनचे ,कार्य अध्यक्ष आमदार विजयसिंह पंडित ( राजे ) , सचिव डॉ.सय्यद अरशियान उल्लाह मिसबाह उल्लाह, डॉ. सय्यद मसीह, ॲड.शेख शफीक भाऊ, श्री.अविनाश नाईकवाडे, श्री.विक्रांत हजारे , गोरख कैवाडे , सय्यद सिराज सर ( परळी ), जिल्हा बॉडी बिल्डिंग असोसिएशन चे सचिव सय्यद अमान उल्लाह यांनी केले
( अधिक माहितीसाठी संपर्क करा जिल्हा बॉडी बिल्डिंग असोसिएशन सचिव सय्यद अमान उल्लाह लाईफ जिम बीड ८१४९७७७७९७ )


