रस्त्यावर बाळासह सापडलेल्या महिलेला जिव्हाळा निवारा केंद्रात आश्रय; सामाजिक कार्यकर्त्या आम्रपाली साबळे यांची मदत
आज जिव्हाळा बेघर निवारा केंद्रामध्ये बीड शहरातील सामाजिक
कार्यकर्त्या सौ. आम्रपाली साबळे यांनी, एक महिला आपल्या लहान बाळासोबत रोडच्या कडेला झोपलेली त्यांना आढळून आली. त्यांनी गाडी थांबवून सदर महिलेची चौकशी केली असता, सदर महिलेला तिचा पती त्रास देतो, हनमार करतो आणि घरामधून हाकलून देतो असे त्या महिलेने तिची दुःखद व्यथा सांगितली. आम्रपाली ताईंनी सदर महिलेला ताबडतोब भाजी मंडईत असलेल्या जिव्हाळा बेघर निवारा केंद्रामध्ये आणून सोडले आहे. आज जिव्हाळा केंद्रामध्ये सदर महिलेचे ऍडमिशन करून घेतले आहे. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या सौ. आम्रपाली साबळे तसेच व्यवस्थापक राजू वंजारे, यश वंजारे आणि महिला काळजीवाहक छायाताई सरोदे उपस्थित होते.


