*क्रांतिकारी शिक्षक संघटना मुळे नाजीय मॅडम यांच्या मागण्या मान्य*
अंबाजोगाई : फातिमा उर्दू माध्यमिक शाळेच्या नाजीय मॅडम यांनी शालार्थ व इतर प्रलंबित मागण्यांसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी बीड यांच्या कार्यालयासमोर सुरू केलेल्या बेमुदत आमरण उपोषणाला अखेर यश आले आहे. या आंदोलनाला क्रांतिकारी शिक्षक संघटनेचे भक्कम पाठबळ लाभले. संघटनेचे संस्थापक सचिव आदरणीय श्री शाहेद कादरी सर यांनी विषयाची गांभीर्याने दखल घेत प्रशासनाशी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे संबंधित प्रश्नांना गती मिळाली आणि प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली. शेवटी शालार्थसह इतर महत्त्वाच्या मागण्या मान्य करण्यात आल्याने नाजीय मॅडम यांना न्याय मिळाला आहे. या यशामुळे शिक्षकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, संघटनेची एकजूट, निष्ठा आणि लढाऊ वृत्ती पुन्हा अधोरेखित झाली आहे.क्रांतिकारी शिक्षक संघटना तसेच आदरणीय हाजी कादरी शाहेद सर यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.


