एशिया न्यूज बीड

यशस्वी तरुणांचा अजमल अरबीक अँड इंग्लिश स्कूलमध्ये भव्य सत्कार*

यशस्वी तरुणांचा अजमल अरबीक अँड इंग्लिश स्कूलमध्ये भव्य सत्कार*

*यशस्वी तरुणांचा अजमल अरबीक अँड इंग्लिश स्कूलमध्ये भव्य सत्कार*

बीड | प्रतिनिधी

बीड येथील अजमल अरबीक अँड इंग्लिश स्कूलमध्ये प्रेरणादायी वातावरणात यशस्वी तरुणांचा भव्य सत्कार सोहळा नुकताच संपन्न झाला. समाजात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आणि विविध क्षेत्रात यश मिळवणाऱ्या तरुणांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

क्रांतिकारी शिक्षक संघटनेचे सचिव हाजी शाहिद कादरी सर तसेच शाळेचे संचालक मुफ्ती शेख आसिफ कासमी यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कारमूर्तींची ‘गुलपोशी’ करून त्यांना गौरविण्यात आले.

सत्कारमूर्तींमध्ये इम्रान पठाण (धाराशिव/उस्मानाबाद पोलीस दल), रियाज पठाण (बीड पोलीस दल), अकील पठाण (बीड पोलीस दल), सद्दाम पटेल (BMC तसेच नागपूर महानगरपालिकेत टॅक्स कलेक्टर पदावर निवड) आणि शब्बीर पटेल (मुंबई पोलीस) यांचा समावेश होता. या सर्वांनी आपल्या मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर समाजाचा मान उंचावला आहे.

यावेळी मुफ्ती शेख आसिफ कासमी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ठाम निर्धार आणि कठोर परिश्रम यांच्या बळावर कोणतेही ध्येय साध्य करता येते, असा प्रेरणादायी संदेश दिला.

हा सत्कार सोहळा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून, उपस्थितांनी कार्यक्रमाचे कौतुक केले. शेवटी सर्व सत्कारमूर्तींना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *