एशिया न्यूज बीड

मुस्लिम आरक्षण मोर्चाला लाखोंच्या संख्येने उपस्थित राहा – नवीद पटेल

मुस्लिम आरक्षण मोर्चाला लाखोंच्या संख्येने उपस्थित राहा – नवीद पटेल

मुस्लिम आरक्षण मोर्चाला लाखोंच्या संख्येने उपस्थित राहा – नवीद पटेल

📍 बीड | प्रतिनिधी

मुस्लिम समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी १७ तारखेला बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून, या मोर्चात लाखोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन युवक नेते नवीद पटेल यांनी केले आहे.

मुस्लिम आरक्षण कृती समितीच्या वतीने आयोजित या मोर्चासाठी जोरदार तयारी सुरू असून, जिल्ह्यात विविध ठिकाणी बैठका, जनजागृती मोहीम व संपर्क अभियान राबविण्यात येत आहे. समाजातील सर्व घटकांना एकत्र आणून हा मोर्चा यशस्वी करण्याचा प्रयत्न आयोजकांकडून केला जात आहे.

नवीद पटेल यांनी सांगितले की, शिक्षण, नोकरी व सामाजिक न्यायासाठी मुस्लिम समाजाला आरक्षण मिळणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे १७ तारखेला होणाऱ्या या मोर्चात युवक, महिला व जेष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.

या मोर्चाच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला जाणार असून, मागण्या मान्य न झाल्यास पुढील काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

समाजातील सर्व घटकांनी एकजुटीने या भव्य मोर्चात सहभागी होऊन आपल्या हक्कांसाठी आवाज उठवावा, असे आवाहन नवीद पटेल यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *