शिक्षण विभाग व वेतन पथक कार्यालयाने दिलेला शब्द पाळला;महापुरुषांच्या जयंतीपूर्वीच जिल्ह्यातील शिक्षकांचे वेतन खात्यात जमा!
तांत्रिक अडचणीमुळे ज्या शाळेंचे पगार झाले नाहीत त्यांनी कार्यालयाशी संपर्क साधावा
बीड, दि. १० (प्रतिनिधी): क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपूर्वी वेतन मिळावे, या मागणीसाठी ‘बीड जिल्हा विनाअनुदानित शाळा कृती समिती’च्या वतीने शिक्षणाधिकारी श्रीमती प्रियाराणी पाटील मॅडम व वेतन पथक अधीक्षक श्री राजेश खटावकर यांना निवेदन दिले होते. त्या वेळी श्रीमती पाटील मॅडम व श्री खटावकर साहेब यांनी संच मान्यता व समायोजनाची “प्रक्रिया पूर्ण होताच १० एप्रिलपर्यंत वेतन शिक्षकांच्या खात्यावर जमा करू,”असे दिलेला होता. आज रोजी हा शब्द खरा करून दाखविला.
आज १० एप्रिल रोजी बीड जिल्ह्यातील सर्व शिक्षकांचे पगार त्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी शिक्षण विभाग आणि वेतन व भविष्य निर्वाह निधी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी केलेल्या प्रयत्ना बद्दल बीड जिल्हा विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने वैजनाथ चाटे, जितेंद्र डोंगरे, मुक्ता मोटे मॅडम, तुकाराम शिंदे, आत्माराम वाव्हळ, शेख सर, तुकाराम खाडे, अशोक मोरे, बाळासाहेब नागरगोजे, भागवत यादव, सुरेश कदम, प्रताप पवार, अरविंद सौंदलकर, सुभाष मोरे, रवींद्र भुकन, अंकुश गवळी शिवप्रसाद सिरसाट आदींनी विशेष आभार मानले आहेत.
___________________________


