एशिया न्यूज बीड

मुस्लिम समाजाच्या आरक्षण संरक्षणासाठी एक मे ला आंदोलन करणार या आंदोलनाने बीड मुंबई दिल्लीचे लक्ष केंद्रीत करणार

मुस्लिम समाजाच्या आरक्षण संरक्षणासाठी एक मे ला आंदोलन करणार या आंदोलनाने बीड मुंबई दिल्लीचे लक्ष केंद्रीत करणार
  • मुस्लिम समाजाच्या आरक्षण संरक्षणासाठी एक मे ला आंदोलन करणार या आंदोलनाने बीड मुंबई दिल्लीचे लक्ष केंद्रीत करणार⋅

 ॲड. प्रा. इलियास इनामदार

बीड प्रतिनिधि: मुस्लिम आरक्षणाचे आंदोलन न थांबता त्याला गती व बळकटी मिळण्यासाठी मुस्लिम समाजाच्या आरक्षण संरक्षणासाठी महाराष्ट्र दिनी एक मे ला आंदोलन करणार या आंदोलनाने बीड मुंबई दिल्लीचे लक्ष केंद्रीत करणार आंदोलनापुर्वी मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार अशी माहीती आंदोलनकर्ते ॲड. प्रा. इलियास इनामदार यांनी दिली आहे. 

      कोर्टाने मान्य केलेले मुस्लिम आरक्षण शासनाने रद्द केले त्याच्या निषेधार्थ व मुस्लिम आरक्षणामध्ये योग्य सुधारणा करुन दहा टक्के आरक्षण दयावे, सच्चर समिती रंगनाथ मिश्रा आयोग व महेमूर्दुरहेमान समितीच्या निकषावर आधारीत महाराष्ट्रामध्ये राज्य मागास आयोगा मार्फत मुस्लिम समाजाचा शैक्षणिक सामाजिक व आर्थिक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सर्वे करण्यात यावा. 

     देशात व विशेष करुन महाराष्ट्रामध्ये काही समाज कंटकाकडून मुस्लिम समाजाला धार्मिक द्ववेषापोटी टारगेट करण्यात येत आहे शासनाने त्यांच्या विरोधात कडक कार्यवाही करावी व अल्पसंख्याक संरक्षण कायदा बनवावे .

अल्पसंख्याक जिल्हा समित्या स्थापन करावे, मंजुर झालेले उर्दू घर तात्काळ बनवावे, मंजुर झालेले मुलींचे वस्तीगृहाला जागा देवुन तात्काळ बनवून दयावे. या समाजाच्या मुख्य मागण्यासाठी एक मे ला इलियास इनामदार आंदोलन करणार आहे. व वेळ पडल्यास हे आंदोलन बेमुदत उपोषणामध्ये कन्वर्ट करण्यात येणार आहे.

      बीड जिल्हयातील जनतेने व विशेष करुन मुस्लिम समाजाने या आंदोलनामध्ये सामिल व्हावे असे आवाहन आंदोलनकर्ते इलियास इनामदार यांनी प्रसिद्धीमाध्यमाद्वारे केले आहे.

                        

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *