एशिया न्यूज बीड

वक्फ मंडळाचे अद्यावत संग्रहालय पुन्हा पर्यटकांच्या सेवेत सुरू* …… *संशोधनासाठी एक हजार पुस्तकांचे वाचनालय लवकरच सुरू करणार*

वक्फ मंडळाचे अद्यावत संग्रहालय पुन्हा पर्यटकांच्या सेवेत सुरू*  …… *संशोधनासाठी एक हजार पुस्तकांचे वाचनालय लवकरच सुरू करणार*

*वक्फ मंडळाचे अद्यावत संग्रहालय पुन्हा पर्यटकांच्या सेवेत सुरू*

…… *संशोधनासाठी एक हजार पुस्तकांचे वाचनालय लवकरच सुरू करणार*

सीएसनगर(औरंगाबाद) *ऐतिहासिक पाणचक्की येथील संग्रहालय अद्यावत करण्यात आले असून ते पुन्हा देश-विदेशातील पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे.राज्य वक्फ मंडळाचे अध्यक्ष समीर काझी यांच्या उपस्थित सुरू करण्यात आले आहे.पाणचक्की येथे राष्ट्रीय स्तराचे वाचनालय ही जनतेच्या सेवेत लवकरच सुरू करण्यात येईल,विविध विषयातील तब्बल एक हजार पुस्तकांचा खजिना जमा केला जाणार आहे, अशी माहिती ही या वेळी समीर काझी यांनी दिली.*

…..हजरत बाबाशाह मुसाफिर यांचे तब्बल तीनशे वर्षांपूर्वी येथे वास्तव्य होते,त्यांनी धार्मिक व राष्ट्रीय एकात्मतेचे महत्वपूर्ण कार्य केले,त्यांची शिकवण नव्या पीडिला मिळावी,असा उद्देश ही समीर काझी यांनी बोलून दाखविला.संग्रहालयात काबा शरीफ व मदिना मुनवरा येथील गिलाफ,तसेच बाबाशाह मुसाफिर यांनी आपल्या जीवनात ज्या वास्तूंचा उपयोग केला,अश्या अनेक वास्तू संग्रहालयात ठेवण्यात आल्या आहेत.पाणचक्की या ठिकाण एकेकाळी देश विदेशातील धार्मिक व सामाजिक विद्वानांनी लिहिलेली पुस्तकांची मोठं वाचनालय म्हणून प्रसिद्ध होते,सध्या तब्बल दोन हजार हस्तलिखित पुस्तकांचा खजिना आहे,लवकरच अशी दुर्मिळ पुस्तके देशभरातून जमा केली जाणार आहे,हे वाचनालय नवीन पीडित विद्यार्थी व संशोधकांना लाभदायक ठरणार आहे,त्यावर आमचे काम सुरू असल्याचेही समीर काझी यांनी सांगितले.या वेळी मंडळाचे सदस्य एयु पठाण,हसनैन शाकिर, इफतेखार हाश्मी,मुख्यकार्यकारी अधिकारी फैयाज खान,उपमुख्यकार्यकरी अधिकारी मुशीर अहमद शेख,विशेष अधीक्षक खुसरोखान व इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

*बॉक्स*

 *वाचनालयातील पुस्तक आता ऑनलाईन*

   — *वक्फ मंडळाच्या वाचनालायतील पुस्तके आता ऑनलाईन उपलब्ध होणार आहे.गोरगरीब व होतकरू विद्यार्थ्यांना जे शहरात येऊ शकत नाही किंवा संशोधनासाठी पुस्तके खरेदी करू शकत नाही,त्या विद्यार्थ्यांना ही मोठी संधी असणार आहे यात सुफीनिझम बाबत अनेक प्रकाशित पुस्तकेही उपलब्ध असणार आहे,विविध विषयांवरील पर्शियन,उर्दू व अरेबिक पुस्तक ही उपलब्ध करून देण्यात येईल असा मानस मंडळाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी मुशीर अहमद शेख यांनी व्यक्त केला.तसेच पैगंबर साहेबांच्या मोहे मुबारकचे दर्शन श्रद्धालुना आता मोहरमच्या एक ते दहा तारखे पर्यंत करता येणार आहे.अशी माहिती ही या वेळी देण्यात आली*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *