परळीतील तोहीद खान हत्या प्रकरणात दोषींना कठोर शिक्षा द्या : नुमान चाऊस
माजलगाव, दि. ४ जून : परळी येथील तोहीद खान यांच्या हत्या प्रकरणातील दोषींना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी तसेच या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून पीडित कुटुंबाला तातडीने न्याय मिळवून द्यावा, या मागणीसाठी आज उपविभागीय अधिकारी, माजलगाव यांना निवेदन देण्यात आले.
अल्पसंख्यांक मुस्लिम संरक्षण समिती, शेतकरी कामगार पक्ष, मौलाना आझाद युवा मंच, APCR आणि जकीबाबा सोशल वेल्फेअर फाउंडेशन यांच्या संयुक्त वतीने हे निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी मौलाना आझाद युवा मंचचे जिल्हाध्यक्ष नुमान अली चाऊस यांनी सांगितले की, परळीतील तोहीद खान हत्या प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच न्यायालयीन प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करून पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
निवेदन देताना ॲड. नारायण गोले पाटील, ॲड. नासेर खान, नगरसेवक सय्यद लतीफ, शेख शौकत, इरफान मिर्झा, ॲड. डोंगरे, बाबा काझी, नवीद सिद्दीकी, ॲड. भास्कर उजगरे, गोरख टाकणखार, शेख सत्तार टेलर, जय राम राऊत, सुनील शेवाळे, गुलाब शेख, शेख इकरार, जावेद पटेल, सलमान खान यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या घटनेबाबत नागरिकांमध्ये तीव्र संताप असून दोषींना कठोर शिक्षा होईपर्यंत न्यायासाठीचा लढा सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.


