वक्फ बोर्डाच्या बैठकीत ऐतिहासिक आणि समाजहिताचे निर्णय!
महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाच्या अलीकडील बैठकीत कामकाजाला गती, पारदर्शकता आणि परिणामकारकता देणारे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. विशेष म्हणजे, बोर्डासमोर आलेल्या 21 विषयांपैकी तब्बल 11 तक्रारी व मुद्द्यांचा एकाच दिवशी निपटारा करण्यात आला, ही वक्फ बोर्डाच्या इतिहासातील अभूतपूर्व बाब ठरली आहे.
निर्णय प्रक्रियेत पारदर्शकता आणल्यामुळे प्रलंबित विषय निकाली काढण्यास वेग आला असून, समाजाच्या हिताच्या दृष्टीने अनेक सकारात्मक पावले उचलण्यात आली आहेत. उच्च शिक्षण घेणाऱ्या तसेच पीएच.डी. करण्याची इच्छा असलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही यावेळी घेण्यात आला.
याशिवाय, राज्यातील मस्जिद व दरगाह यांच्या दस्तऐवजीकरणातील त्रुटी दूर करण्यासाठी विशेष पथकाची स्थापना करण्यात येणार असून, वक्फ मालमत्तांचे संरक्षण आणि व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी ठोस उपाययोजना राबविण्यात येतील.
महायुती सरकार मुस्लिम समाजाच्या विकास, कल्याण आणि हक्कांप्रती कटिबद्ध असून, समाजहिताच्या प्रत्येक प्रश्नावर सकारात्मक भूमिका घेत आहे. मुस्लिम समाजाच्या हक्कांचे संरक्षण, शैक्षणिक प्रगती आणि वक्फ संस्थांच्या सक्षमीकरणासाठी माझ्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्ड निरंतर कार्यरत राहील.


