⋅*अल खैर फाऊंडेशन कडून 350 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची भेट.*
*अल खैर फाऊंडेशनतर्फे महाराष्ट्र पोलीस दलात निवड झालेले नव नियुक्त पोलिस, दहावी गुणवंतांचा सत्कार, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सत्कार व 350 गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न*
बीड, महाराष्ट्र: मागील आठ वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या अल खैर फाऊंडेशनने नुकताच एक भव्य सत्कार आणि शालेय साहित्य वाटप कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमात महाराष्ट्र पोलीस दलात निवड झालेल्या नव नियुक्त पोलिसांचा, दहावी चे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला, तसेच सामाजिक, शैक्षणिक, पत्रकार , वैद्यकीय व सामाजिक संघटनांना सारख्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. यासोबतच 350 गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटपही करण्यात आले.या उपक्रमांतर्गत ३५० हून अधिक अनाथ आणि गरजू विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, ६ रजिस्टर, पेन, पेन्सिल, रबर, स्केल आदी साहित्याचे संच वाटप करण्यात आले. यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे.
अल खैर फाऊंडेशन वैद्यकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रांमध्ये सातत्याने मदत करत आहे. दर महिन्याला १०० गरीब कुटुंबांना फूड किट (अन्नधान्य) वाटप करण्यासोबतच, गेल्या चार वर्षांपासून अल खैर चॅरिटेबल क्लिनिक केवळ ५० रुपयांमध्ये तपासणी आणि मोफत औषधे उपलब्ध करून देत आहे. अल खैर चॅरिटेबल क्लिनिक दोन ठिकाणी सध्या रुग्ण सेवा देत आहेत मोमीन पुरा बायपास रोड येथे आणी गांधी नगर नाळवंडी नाका येथे सकाळ व संध्याकाळी शिफ्ट मध्ये चालू आहे . शिक्षणातही कोणीही मागे राहू नये या हेतूने फाऊंडेशनने गरजू विद्यार्थ्यांना शालेय दप्तर, वह्या, पेन, पट्टी, पेन्सिल, रबर, शार्पनर इत्यादी वस्तूंचे वाटप केले.
या कार्यक्रमात अल खैर फाऊंडेशनच्या पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणातून महाराष्ट्र पोलीस दलात निवड झालेल्या 07 नव नियुक्त पोलिसांचा शाल, प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये सय्यद जमीर, शोएब बेग, इम्रान खान, अखिल पठाण, रियाज पठाण, रेहान अब्दूल, अक्रम पाशा यांचा समावेश होता.
कार्यक्रमात शिक्षण, सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल 7 मान्यवर व त्यांच्या टीमला सन्मानचिन्ह व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. यामध्ये सैफ अली सर (शैक्षणिक मार्गदर्शक), आस्मा खान रईस खान (आयकोनिक जर्नलिस्ट अवॉर्ड), व्हिक्टिम शेल्टर (सोशल इम्पॅक्ट अवॉर्ड), शेख आदिल सर (डॉ. अल्लामा इकबाल अवॉर्ड), सय्यद शम्सुल आबेदीन (मौलाना अबुल कलाम आझाद अवॉर्ड), मोमिन रईस मोमिन नजीर (सर सय्यद ए सानी अवॉर्ड), सौतुल इस्लाम फाउंडेशन (खिदमत-ए-इन्सानियत अवॉर्ड) यांचा समावेश आहे
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ सय्यद वहाब ( जिल्हा न्यायाधीश), डॉ अर्षद शेख ( अध्यक्ष पीस फाऊंडेशन) मुजतबा फारूक सहाब ( JIH मरकजी तालीम बोर्ड के अध्यक्ष) , अब्दुल खालेक सहाब, रफीक तांबोळी सर, अब्दुल वकील सर सय्यद फेरोज सहाब ( उप संपादक अभिमान न्यूज ) , डॉ इम्रान खान सर इतर शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते. , गुलाम साकिब सर आणि अल खैर फाऊंडेशनचे अध्यक्ष इंजी. इनामदार अझहर सर, रजी सर उपस्थित होते.
प्रमुख वक्ते डॉ. अर्शद शेख यांनी पालक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, मुलांमध्ये सर्जनशील विचार (क्रिएटिव्ह थिंकिंग) रुजवा, त्यांना खेळण्याची संधी द्या आणि उत्तम संस्कार देऊन एक चांगला माणूस घडवा. कार्यक्रमाचे अध्यक्ष जज डॉ. वहाब सय्यद यांनी पालकांना मुलांच्या मूलभूत अधिकारांविषयी माहिती दिली. कोणत्याही कठीण प्रसंगी घाबरू नका, प्रशासन आणि न्यायालय मुलांना मोफत कायदेशीर मदत मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर असल्याचे त्यांनी आश्वासित केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन. साकेब सर यांनी केले, तर आभारप्रदर्शन रजी सर यांनी केले.
हा कार्यक्रम अल खैर फाऊंडेशनच्या सामाजिक बांधिलकीचे आणि शिक्षण व सेवाभावी कार्याप्रती असलेल्या कटिबद्धतेचे उत्तम उदाहरण ठरला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अल खैर टीम अतुल केदार सर, आतिफ सय्यद, शेख रफत शाहरुख, अझहर इनामदार, रजी सर, आमिर खान, मोहसीन करीम, वसीम खान, शाहेबाज खान, असरार भाई, अरहम साबरी, अयान भाई, बॉस ग्रुप, अल-खैर क्लिनिकचा स्टाफ आणि संपूर्ण अल-खैर टीमने कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले. सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवणारा हा कार्यक्रम गरजू विद्यार्थ्यांसाठी मोठा आधार ठरला आहे.


