एशिया न्यूज बीड

अल्पसंख्याक संरक्षण कायद्यासाठी विधिमंडळात लक्षवेधीची मागणी; संघर्ष समितीचे आमदारांना निवेदन विधीमंडळात संरक्षणासाठी गरजणार आ. रोहित दादा पवार व आ. संदीप भैया क्षीरसागर यांनी दिले  आश्वासन खुर्शिद आलमचे भेटीसाठी प्रयत्न

अल्पसंख्याक संरक्षण कायद्यासाठी विधिमंडळात लक्षवेधीची मागणी; संघर्ष समितीचे आमदारांना निवेदन  विधीमंडळात संरक्षणासाठी गरजणार आ. रोहित दादा पवार व आ. संदीप भैया क्षीरसागर यांनी दिले   आश्वासन खुर्शिद आलमचे भेटीसाठी प्रयत्न

 

अल्पसंख्याक संरक्षण कायद्यासाठी विधिमंडळात लक्षवेधीची मागणी; संघर्ष समितीचे आमदारांना निवेदन

विधीमंडळात संरक्षणासाठी गरजणार आ. रोहित दादा पवार व आ. संदीप भैया क्षीरसागर यांनी दिले 

आश्वासन खुर्शिद आलमचे भेटीसाठी प्रयत्न

बीड | प्रतिनिधी अल्पसंख्याक संरक्षण संघर्ष समितीच्या वतीने राज्यात अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी स्वतंत्र अल्पसंख्याक संरक्षण कायदा तयार करून तो तातडीने लागू करण्यात यावा यासाठी प्रा. इलियास इनामदार व अल्पसंख्याक संरक्षण संघर्ष समिती राज्यभर आंदोलन करत आहे, यासाठी आ. रोहितदादा पवार व आ. संदीप भैय्या क्षीरसागर यांना निवेदन देण्यात आले.

     या निवेदनाद्वारे राज्यातील अल्पसंख्याक समाजावर होणारे अन्याय, द्वेषपूर्ण वक्तव्ये, धार्मिक भावना दुखावणाऱ्या घटना आणि सामाजिक सलोखा बिघडविण्याच्या वाढत्या प्रकारांच्या पार्श्वभूमीवर अल्पसंख्याकांच्या घटनात्मक अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी स्वतंत्र कायद्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली.

समितीने संबंधित आमदारांना आगामी विधिमंडळ अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडून शासनाचे लक्ष या गंभीर विषयाकडे वेधावे तसेच अल्पसंख्याक संरक्षण कायदा तयार करून तो तातडीने लागू करण्यासाठी शासनाकडे प्रभावी पाठपुरावा करावा, अशी मागणी केली.

     अल्पसंख्याक संरक्षण संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने सांगितले की, हा कायदा कोणत्याही समाजाविरोधात नसून राज्यातील अल्पसंख्याकांना संविधानाने दिलेल्या अधिकाराचे संरक्षण, सामाजिक सौहार्द आणि कायद्यावरील विश्वास अधिक बळकट करण्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी या मागणीला पाठिंबा देऊन शासनाकडे सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षाही समितीच्या वतीने व्यक्त करण्यात आली. भेटी दरम्यान आ. रोहित दादा पवार यांनी सांगितले की विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे या अधिवेशनामध्ये अल्पसंख्याक संरक्षण कायदयासाठी आवाज उठवणार आ. संदीप भैय्या क्षीरसागर यांनी आश्वासन दिले. 

     आ. रोहित पवार यांची भेट व्हावी म्हणून नगरपालिकेचे गटनेते खुर्शिद आलम यांनी प्रयत्न केले त्यांचे समितीच्या वतीने सर्वांनी आभार मानले सोबत माजी आ. सय्यद सलीम होते.निवेदन देताना मुजतबा अहमद खान शेख मुसा सर मुशीर इनामदार सलीम खान खदीरुज्जमा खान शेख ऐतेशाम अरफात खान सय्यद सलमान आबेद कादरी डॉ. शेख मोहसीन ॲड. अखिल मोमीन गुड्डू चाऊस वाजेद मोमीन होते सर्वांचे आभार समिती निमंत्रक प्रा. इलियास इनामदार यांनी मानले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *