खा. सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी अन्नदान व फळवाटप
बैनर. डिजे. एवजी गरिबांची सेवा हीच खरी समाजसेवा – खुर्शीद आलम
बीड ( प्रतिनिधी )
खासदार बजरंगबप्पा सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त डिजे. बैनरबाजी वगैरे न करता बीड शहरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. समाजातील गरजू व रुग्णसेवेला प्राधान्य देत शासकीय रुग्णालय, बसस्थानक तसेच जिव्हाळा बेघर निवासी केंद्र येथे अन्नदान आणि फळवाटपाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
यावेळी बीड येथील शासकीय रुग्णालयातील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना डाळ-खिचडी व फळांचे वाटप करण्यात आले. तसेच बीड बसस्थानक परिसरातील गरजू नागरिकांना डाळ-खिचडी व फळांचे वितरण करून सामाजिक बांधिलकी जपण्यात आली.
त्यानंतर जिव्हाळा बेघर निवासी केंद्र, बीड येथे बेघर व गरजू नागरिकांना अन्नदान करण्यात आले. या सेवाभावी उपक्रमांद्वारे खासदार बजरंग (बप्पा) सोनवणे यांचा वाढदिवस समाजोपयोगी कार्यातून साजरा करण्यात आला.
या प्रसंगी बीड नगरपालिकेचे गटनेते खुर्शीद आलम, नगरसेवक रईस भैय्या शेख, नगरसेवक अफसरभाई शेख, नगरसेवक अशोक काळे, हाजी नजीर साहेब, संजय सोनवणे, शैलेश नाईकवाडे हारून बागवान, अमित चव्हाण, सैय्यद इब्राहिम, गणेश शेळके, मोहम्मद टेलर, हरिदास टकीत, शुभम स्वामी, रियाज भाई, तसेच इतर सहकारी मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी खासदार बजरंग (बप्पा) सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबविण्याची परंपरा कायम ठेवण्याचा संकल्प व्यक्त केला. गरजूंची सेवा हीच खरी समाजसेवा असल्याची भावना गटनेते खुर्शीद आलम यांनी व्यक्त केला. यावेळी उपस्थितांनी खा. बजरंगबप्पा सोनवणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय सोनवणे यांनी परिश्रम घेतले आहे,


