अल्पसंख्याक मुस्लिम समाजावर होणारे अन्याय अत्याचार रोखण्यासाठी शनिवारी आठ ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय बैठक सर्वांनी उपस्थित रहावे
अल्पसंख्याक संरक्षण संघर्ष समिती
बीड प्रतिनिधि: शासनाने राज्यात व देश पातळीवर अल्पसंख्याक संरक्षण कायदा बनवून अल्पसंख्याक समाजाला विशेष करुन मुस्लिम समाजाचे जातीय दंगली हेटस्पिच मॉबलिचींग बुलडोजर कार्यवाही धार्मिक स्थळांवर हल्ले सोशलमीडियाच्या माध्यमाने उलटसुलट वक्तव्य करणे शैक्षणिक धार्मिक शिक्षण संस्थांना टारगेट करणे अशा अनेक
समस्यांपासुन संरक्षण होण्याकरिता ऑक्टोबरमध्ये दिल्ली जंतरमंतरवर आंदोलन करणे व डिसेंबरमध्ये विधीमंडळाच्या अधिवेशनासाठी नागपुरला आंदोलन करण्यासाठी बीड जिल्हयातील उलेमा इकराम, सामाजिक कार्यकर्ते राजकीय नेते विविध क्षेत्रात काम करणारे समाजसेवक युवावर्ग, विदयार्थी सर्वांनी शनिवारी दि. आठ ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता जी. एन. फंक्शन हॉल मोमीन पुरा बीड येथे या बैठकीला उपस्थित रहावे अशी विनंती अल्पसंख्याक संरक्षण संघर्ष समिती निमंत्रक ॲड. इलियास इनामदार, मुजतबा अहमद खान शेख मुसा सर मौलाना मैनु साहेब मुशीर इनामदार खदीरुज्जमा पठाण अरफात खान शेख वजीर सर शेख मैनू सय्यद सलमान समीर सरकार ॲड. मोमीन अखील सलीम खान शेख ऐतेशाम सय्यद नबीलुज्जमा गुड्डू चाऊस डॉ. मोसीन सर आबेद कादरी सुफियान मणियार प्रा. अमर शेख इमरान शिकलगार सय्यद आबेद अब्दुल बारी इमरान सलमान खान मोमीन वाजेद पाशा भाई साद खान अंज़र पटेल तलहा काजी इमरान इनामदार प्रा. जावेद पाशा प्रा. रफिक बागवान काजी माजेद सर डॉ. इद्रिस हाशमी हनीफ खान रिज़वान खानसह अल्पसंख्याक संरक्षण संघर्ष समितीने आवाहन व विनंती केलेली आहे.


