मिल्लीया महाविद्यालयात संविधान दिन साजरा
बीड: येथील मिल्लीया कला, विज्ञान व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग व राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी संविधान दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहम्मद इलयास फाजील, उपप्राचार्य प्रोफेसर हुसैनी एसएस, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रोफेसर रमेश वारे, प्रा. शोएब पीरजादे, डॉ. शामल जाधव, राज्यशास्त्र विभागाचे डॉ. शेख गफूर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमाधिकारी डॉ. शामल जाधव यांनी केले. त्यांनी सांगितले की , प्रत्येक भारतीय नागरिकात संविधान घटना, प्रास्ताविका यातील उच्च तत्वे, मूल्ये याबद्दल माहिती व्हावी. भारतीय संविधान हे सर्वश्रेष्ठ असून, त्यातून भारतीय जीवनशैली, स्वतंत्र, समता, बंधुता व सर्वधर्म समभावाची शिकवण मिळते तसेच संविधानाने आपल्याला अनेक हक्क दिले आहेत, त्यामुळे आपण संपूर्ण स्वातंत्र्य आणि समानतेने जीवन जगतो. भारतीय राज्यघटनेबाबत जागरूकता वाढवणे, घटनात्मक अधिकार व कर्तव्या बद्दल विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता वाढवने आवश्यक आहे असे सांगितले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहम्मद इलयास फाजील यांनी संविधानातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान, भारतीय संविधानातील मूल्य, त्यांचे अर्थ, प्रत्येक भारतीयाची मूलभूत कर्तव्य यावर मार्गदर्शन केले. तसेच डॉ. शेख गफूर यांनी संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. कार्यक्रमाचे आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रोफेसर रमेश वारे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमास सर्व प्राध्यापक वृंद, कर्मचारी वृंद व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी-विद्यार्थिनी यांची उपस्थिती होती.


