एशिया न्यूज बीड

आ. विजयसिंह पंडित यांची लोकसेना भवनला भेट संघर्षयोध्दा इलियास इनामदार यांची भेट घेवून सामाजिक विषयावर केली चर्चा अजीत दादा पवार यांचे हात बळकट करण्यासाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे केले आवाहन

आ. विजयसिंह पंडित यांची लोकसेना भवनला भेट  संघर्षयोध्दा इलियास इनामदार यांची भेट घेवून सामाजिक विषयावर केली चर्चा अजीत दादा पवार यांचे हात बळकट करण्यासाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे केले आवाहन

आ. विजयसिंह पंडित यांची लोकसेना भवनला भेट

संघर्षयोध्दा इलियास इनामदार यांची भेट घेवून सामाजिक विषयावर केली चर्चा अजीत दादा पवार यांचे हात बळकट करण्यासाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे केले आवाहन

 

बीड प्रतिनिधि: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या म्हणजेच नगर परिषदेच्या निवडणूका लागल्या आहे अनेक पक्षाकडुन उमेदवा-या जाहिर झालेले आहे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष अजित पवार गटाकडुन भीमकन्या माजी नायाब तहसीलदार प्रेमलता दादासाहेब पारवे यांना उमेदवारी मिळालेली आहे

 

  • याविषयी गेवराईचे आमदार व बीडचे प्रभारी मा. विजयसिंह पंडित यांनी लोकसेना भवनला भेट देवून संघर्षयोध्दा इलियास इनामदार यांची भेट घेतली सामाजिक विषय जसे मुस्लिम आरक्षण, अल्पसंख्याक संरक्षण कायदा, मौलाना आज़ाद आर्थिक विकास महामंडळाचे बजेट, राज्यातील प्रत्येक जिल्हयात अल्पसंख्याक कल्याण समिति गठीत करण्यावर भर दयावी बीडला मंजुर झालेले उर्दू घर, मुलींचे हॉस्टेल बालेपीर भागातील नदीकाठचा वाहुन गेलेला रस्ता संरक्षण भींतीसह या विषयावर झाली चर्चा

जर आपण राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना. अजीत दादा पवार यांच्याद्वारे काही विषय विधीमंडळाद्वारे सोडवा व काही विषय नगरपालिकेद्वारे सोडवण्याचे आश्वासन बीड शहरवासीयांना या भेटीतुन आपण देत असाल तर आम्ही तुमच्या उमेदवारांना निवडुण आणण्यासाठी मदत करु यावेळी आ. विजयसिंह पंडित यांनी सांगितले की आपण दिलेले सामाजिक विषय मा. अजित दादा पवार यांच्यासोबत चर्चा करुन सोडवण्यात येतील दादाचे हात बळकट करण्यासाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी बळ देण्याची विंनती याठिकाणी केली.

लोकसेना संघटनेच्या वतीने राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भीमकन्या प्रेमलता दादासाहेब पारवे यांना जाहिर पाठिंबा लोकसेना संघटना प्रमुख ॲड प्रा इलियास इनामदार यांनी घोषीत केला आहे.

सोबत लोकसेना संघटनेच्या सामाजिक आंदोलनामध्ये प्रत्येक पक्षाचे नेते कार्यकर्ते सहभागी असतात सर्वांसोबत आमचे आंदोलनकारी संबध असल्यामुळे प्रत्येक वार्डातील उमेदवाराने येवून भेट घेतली व सहकार्य करण्याची विनंती केली यामुळे सव्वीस वार्डातुन बावन नगरसेवकासाठी जे सुशिक्षित मनमिळावू वार्डात वेळ देवुन काम करणारे नगरपालिकेचा व शासनाचा बजेट आणुन विकासात्मक कामे करणा-या दवाखाने सरकारी दप्तरे पोलिस स्टेशन नगरपालिकेत सहकार्य करणा-या काबील योग्य व्यक्तीला निवडुण दयावे मागच्या निवडणूकीत पैशाची जरुरत असणारे गरजु उमेदवार निवडुण दिल्याने कसे शहराचे बारा वाजले हे सर्वांना ठावूक आहे म्हणुन बीडला पालकमंत्री असणारे राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार साहेब यांच्या ताब्यात नगरपालिका दयावी असे आवाहन या ठिकाणी लोकसेना संघटना प्रमुख संघर्षयोध्दा ॲड प्रा इलियास इनामदार यांनी बीड शहरवासियांना केले आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *