नरेगा वर्ककोड डिलीट; लाभार्थ्यांसाठी तातडीने उपाययोजनांची मागणी
शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली सतीश शेळके यांची निवेदनद्वारे मागणी; लाभार्थ्यांनी तात्काळ पंचायत समिती येथे कागदपत्रांसह संपर्क साधावा
बीड (प्रतिनिधी): नरेगा योजनेअंतर्गत राजुरी नवगण व कामखेडा गणातील सर्व प्रकारच्या कामांचे वर्क कोड डिलीट झाल्याने लाभार्थ्यांपुढे मोठे संकट निर्माण झाले आहे. अनेक गावांमध्ये कामे थांबली असून मजुरांना रोजगार मिळण्यात अडचणी येत आहेत. या गंभीर प्रश्नी तातडीने कार्यवाही करून निलंबित कामे सुरू करणे व मस्टर तात्काळ चालू करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासाठीचे निवेदन वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.
शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. अनिलदादा जगताप साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. सतीश शेळके पाटील यांच्या वतीने मा.ना. श्री. एकनाथरावजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री, मा.ना. श्री. भरतशेठजी गोगावले साहेब, मंत्री रोजगार हमी योजना यांनी मा. आयुक्त साहेब, नरेगा विभाग, नागपूर, मा. जिल्हाधिकारी साहेब, बीड, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब, जि.प. बीड, मा. उपजिल्हाधिकारी साहेब (रोहयो), बीड, मा. उपमुख्य कार्यकारी अधिकारी साहेब (पंचायत), जि.प. बीड सत्वर कार्यवाहीसाठी आदेशीत केले आहे. तसेच गटविकास अधिकारी श्री.राठोड साहेब यांनी लाभार्थ्यांना महत्त्वाची सूचना दिली आहे. कामांच्या पुनर्मंजुरीसाठी (दुबार वर्क कोड) मूळ संचिका व चालू तारखेचा 7/12 उतारा घेऊन तातडीने पंचायत समिती कार्यालयाशी संपर्क साधावा, असे त्यांनी आवाहन केले.
राजुरी नवगण व कामखेडा गणातील सर्व गावांना वर्क कोड डिलीट होण्याचा मोठ्या प्रमाणात फटका बसला असून पुनर्मंजुरी प्रक्रिया सुरू आहे. त्याचबरोबर मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मस्टर तात्काळ सुरू करण्याची मागणी निवेदनात स्पष्टपणे करण्यात आली. लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे लवकरात लवकर जमा करून प्रक्रिया पूर्ण करावी, असे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.


