एशिया न्यूज बीड

नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार वृषालीताई नितीन जायभाय यांनी दिला वचन नामा 

नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार वृषालीताई नितीन जायभाय यांनी दिला वचन नामा 
  • नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार वृषालीताई नितीन जायभाय यांनी दिला वचन नामा

बीड (प्रतिनिधी) – नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवीत असलेल्या आम आदमी पार्टीच्या उमेदवार वृषालीताई नितीन जायभाय यांनी मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी उपस्थित केलेल्या तीन प्रश्नांविषयी त्यांच्याकडे वचन नामा दिला. यावेळी नितीन जायभाय यांची प्रमुख उपस्थिती होती.

या वचननाम्यात नमूद केले आहे की, आपण प्रसिद्धी माध्यमातून दिलेली बातमी वाचली. त्यात आपण उपस्थित केलेले खासबाग-मोमीनपुरा जोडणारे बिंदुसरा नदीवरील नियोजित पुलाचे निर्माण. ऐतिहासिक कारंजा टॉवर चे परिपूर्ण नूतनीकरण व सुशोभीकरण. मोमीनपुरा बायपास येथील महेदवीया दायरा कब्रस्तानच्या तटरक्षक भिंती चे निर्माण. हे तीन प्रश्न दृष्टिक्षेपात आले. यामुळे या पत्राद्वारे बीड नगर परिषदच्या नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढवीत असल्याने हे वचन देते की, नगराध्यक्षपदी निवडून आल्यावर आपण उपस्थित केलेल्या तिन्ही प्रश्नांवर प्राधान्य क्रमाने कार्य करून जनसेवेत देण्यात येतील. असा वचननामा बीड नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवीत असलेल्या उमेदवार वृषाली नितीन जायभाय यांनी मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांना दिला. यावरून वृषालीताई आणि नितीन जायभाय हे दाम्पत्य सामाजिक व सार्वजनिक प्रश्नाविषयी किती दक्ष आहेत हे दिसून आले.

यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, माझे पती तथा बीड शहर बचाव मंच चे निमंत्रक नितीन जायभाय यांनी मंचचे पदाधिकारी व सदस्यांसह महेदवीया दायरा कब्रस्तान च्या दुरावस्थेची पाहणी करून कब्रस्तानच्या तट रक्षक भिंती बांधून देण्यासाठी शब्द दिला आहे. नगराध्यक्षपदी निवडून आल्यावर तो पूर्ण करणारच आहे. त्यासोबतच बिंदुसरा नदीवरील पूल आणि ऐतिहासिक कारंजा टॉवर चे नूतनीकरण व सुशोभीकरण सुद्धा करू. तसेच बीड शहराची झालेली अत्यंत बकाल अवस्था दुर करणे, स्वच्छता, पाणीपुरवठा, शासनाकडून जनतेसाठी येणाऱ्या विविध योजनांची परिपूर्ण अंमलबजावणी याकरिता आम्ही बारा कलमी हमीनामा सुद्धा जनतेसाठी दिला आहे. त्यात उल्लेख केलेल्या सर्व मुद्द्यांवर कार्य करण्याची हमी आम्ही घेतली आहे असे म्हटले. यावेळी अनेकांची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *