जयदत्त क्षीरसागरांच्या पाठिंब्याने डॉ.ज्योती घुबंरे आघाडीवर
जयदत्त क्षीरसागरांच्या सभांना उसळणारी गर्दी विजयाची नांदी ठरेल
बीड/प्रतिनिधी
नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगात आली असून भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार आघाडीवर असल्याचे संकेत मिळत आहेत. भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ. ज्योती घुबंरे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे, निवडणूक प्रचारात सर्वाधिक चर्चेत असलेले नाव म्हणजे लोकनेते माजीमंत्री जयदत्त आण्णा क्षीरसागर हे गेल्या काही दिवसांपासून अलिप्त असल्याची चर्चा असतानाच जयदत्त आण्णा क्षीरसागर यांनी प्रचारात सक्रिय सहभाग घेतला आहे, जयदत्त आण्णा क्षीरसागर यांच्या पाठिंब्याने राजकीय गणिते बदलू लागली आहेत. जयदत्त आण्णा क्षीरसागर यांच्या सभांना प्रचंड गर्दी आणि जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता बीडमध्ये भाजपची स्थिती अधिक भक्कम झाल्याचे दिसून येते आहे.
जयदत्त आण्णा क्षीरसागर यांच्या राजकीय कारकिर्दीत बीड शहरात राबवण्यात आलेल्या अनेक विकासकामांचा ठसा आजही ठळकपणे दिसत आहे. जयदत्त आण्णा क्षीरसागर हे मैदानात उतरले असल्याने कार्यकर्ते हि विजयासाठी उत्साहाने कामाला लागले आहेत, प्रचारातील जोश दुपटीने वाढल्याचे चित्र निर्माण झाले आहे.विशेष म्हणजे जयदत्त आण्णा क्षीरसागर आणि महाराष्ट्र राज्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील सलोख्याचे संबंध भविष्यातील विकास प्रकल्पांसाठी बीडला मोठा फायदा करून देतील, अशी अपेक्षा भाजप कार्यकर्त्यांमध्ये वाढू लागली आहे.शहरातील सर्वच प्रभागांत भाजपला मिळत असलेला उत्साहवर्धक प्रतिसाद, जयदत्त आण्णा क्षीरसागरांची बीड शहरात असलेली मजबूत पकड यामुळे भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ ज्योती घुबंरे व सर्व नगरसेवक हे विजयाच्या उंबरठ्यावर असल्याचे राजकीय जाणकारांचे निरीक्षण आहे.भाजपचा प्रचार वेगाने शिगेला पोहोचत असताना बीडच्या राजकारणात जयदत्त आण्णा क्षीरसागरांचा करिष्मा पुन्हा एकदा स्पष्टपणे जाणवत आहे.


