अनेक वर्षांनी एकत्र आले दहा जिवलग मित्र
सालेहा मझहर शेख चा विवाह सोहळा थाटात साजरा
बीड (प्रतिनिधी) – शहरातील गजानन नागरी सहकारी बँकेत विशेष वसुली अधिकारी असलेले मझहर कय्युम शेख यांची कन्या सालेहाचा विवाह वाशिम जिल्ह्याच्या रिसोड तालुक्यातील रहिवाशी मुहम्मद अजीम यांचे पुत्र मुहम्मद असीम सोबत बीड शहरातील तेलगाव रोड स्थित कोहिनूर लॉन्स येथे दिनांक २७ नोव्हेंबर २०२५ गुरुवार रोजी संध्याकाळी मोठ्या थाटात साजरा झाला. यानिमित्ताने मझहर शेख यांचे बालपणापासूनचे सर्व जिवलग मित्र आवर्जून विशेष उपस्थित राहिले. यात जिल्हा रुग्णालयातील फार्मासिस्ट मीर एजाज अली उस्मानी, सीआयएसएफ चे सेवानिवृत्त जवान शेख फारुख, घाटी रुग्णालयातील लॅब असिस्टंट शेख जमील, सहशिक्षक शेख नजीर, जिल्हा रुग्णालय कर्मचारी शेख शकील, पुणे येथे स्थायिक झालेले व्यवसायी सय्यद मोईन, पोलीस निरीक्षक मुख्तार खान पठाण, सहशिक्षक शेख कलीमोद्दीन आणि मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ यांनी सालेहाच्या लग्नाप्रित्यर्थ आपल्या या जिवलग मित्र व वधू-वरासह संपूर्ण शेख कुटुंबीयांना भरभरून शुभेच्छा दिल्या.


