मदर्स व्हॅली किड्स’ स्कूलच्या भव्य इनेहसंमेलनाने बालेपीर रंगून गेले
बीड प्रतिनिधी :
बालेपीरच्या इतिहासात प्रथमच मदर्स व्हॅली किड्स’ स्कूल, बालेपीर तर्फे आयोजित वार्षिक इनेहसंमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लहानग्यांच्या कला, सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ व विविध उपक्रमांनी उपस्थितांचे मन मोहून टाकले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्य, देशभक्ति गीते, नाटक व फॅन्सी ड्रेस स्पर्धेने वातावरण रंगून गेले. पालक व मान्यवरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला.
या कार्यक्रमामुळे भागात शैक्षणिक व सांस्कृतिक वातावरणाचा नवा मेळ घातला गेला असून, पुढील वर्षी अधिक भव्य स्वरूपात संमेलन आयोजित करण्याची अपेक्षा सर्व शिक्षक आणि शाळेचे सचिव सय्यद अरफात सर यांनी व्यक्त केली जात आहे.


