केज ,अंबाजोगाई तालुक्यातील सर्वच साखर कारखाने २८००/-पहिली उचल देण्यास तयार !
- तहसीलदार राकेश गीड्डे ,पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मध्यस्थीने चक्का जाम आंदोलन स्थगित.!
केज/प्रतिनिधी
केज ,अंबाजोगाई तालुक्यातील अंबा सहकारी साखर कारखाना, येडेश्वरी ऍग्रो प्रॉडक्ट आनंदगाव (सा.)गंगा माऊली शुगर उमरी, केज या कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षी विनाकपात ३०००/- रुपये पहिली उचल देण्याची मागणी करत केज च्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने आज दि.३ डिसेंबर रोजी बेमुदत चक्काजाम आंदोलन पुकारले होते आंदोलनाच्या धास्तीने पोलीस प्रशासन व तहसीलदार,केज यांच्या मध्यस्थीने साखर कारखानदारांचे शेतकी प्रतिनिधी व आंदोलक शेतकरी नेते ,पदाधिकारी यांची आज दि.३डिसेंबर रोजी केज तहसील कार्यालयात संयुक्त बैठक घेण्यात आली या बैठकीला तहसीलदार राकेश गीड्डे , केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक स्वप्निल उणवणे, गंगा माऊली शुगरचे शेतकी अधिकारी श्री.अदनाक , अंबा साखर शेतकी अधिकारी श्री. शिंदे येडेश्वरी ऍग्रो प्रॉडक्ट चे श्री.पाटील शेतकरी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष कालिदास आपेट ,क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे , शेतकरी कामगार पक्षाचे मध्यवर्ती कमिटीचे सदस्य भाई मोहन गुंड व आंदोलक शेतकरी यांची संयुक्त बैठक संपन्न झाली या बैठकीत ऊस दरासंदर्भात अनेक चर्चांच्या फेऱ्या झाल्या शेवटी सर्व साखर कारखान्यांनी यावर्षी गाळप होणाऱ्या ऊसाला पहिली उचल विनाकपात २८००/-रुपये देण्याचे मान्य करत चक्काजाम आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली.व अंतिम ऊस दर रेव्हेन्यू शेअरिंग फॉर्मुल्यानुसार (RSF)देण्याचे निश्चित केले. यावर सर्व शेतकऱ्यांनी एकमत करून चक्काजाम आंदोलन स्थगित केले आज सायंकाळपर्यंत सर्व कारखान्यांनी लेखी पत्र देण्याचे मान्य केले आहे जर त्यांनी लेखी पत्र दिले नाही तर पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसू असा निर्वाणीचा इशारा देखील आंदोलकानी दिला आहे.


