धारूर न्यायालयाचा वर्धापन दिन जिल्हा न्यायाधीश यांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न..
धारूर (प्रतिनिधी) किल्ले धारूर न्यायालयाचा 23 व्या वर्धापन दिनानिमित कार्यक्रम घेण्यात आला, सदरचा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. आनंद यावलकर साहेब यांनी विस्तृत मार्गदर्शन केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालनवकील संघाचे उपअध्यक्ष ॲड. मोहन भोसले तर वकील संघांचे अध्यक्ष ऍड परमेश्वर शिनगारे पाटील यांनी प्रस्ताविकात अडचणी नमूद केल्या व विचार व्यक्त केले, ॲड. पी.डी. मिश्रा, वैष्णवी बडे, यांनी विचार व्यक्त केले, तर आभार ॲड. व्ही. एम शिनगारे यांनी केले, या वेळी या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश बीड मा. श्री. आनंद यावलकर साहेब, जिल्हा अतिरिक्त न्यायाधीश केज मा. श्री. सुधीर भाजीपाले साहेब, तदर्थ जिल्हा न्यायाधीश श्रीमती आर. के शेख मॅडम, धारूर न्यायालयाचे न्यायाधीश श्री एन. एम. वाली साहेब, केज न्यायालय येथील न्यायाधीश श्रीमती एम. एस. कुलकर्णी मॅडम, केज येथील न्यायाधीश श्रीमती पी. व्ही. चव्हाण मॅडम, सरकारी वकील श्री थेरोकर साहेब, ए एस गायसमुंद्रे साहेब, वकील संघ अध्यक्ष ॲड पी.पी. शिनगारे पाटील, उपाध्यक्ष ॲड एम.बी. भोसले, सचिव सी बी हांगे मैडम, कोषाध्यक्ष ॲड.एस जे गडदे, ग्रंथालय ॲड. आर. एस सावंत, तसेच वकील बांधव कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते..


