एशिया न्यूज बीड

बीड नगर परिषद चे सफाई कामगार झाले आता गुत्तेदार! स्वच्छता निरीक्षक-मुकादम गायब; मुख्याधिकारी फडसे करताहेत काय?

बीड नगर परिषद चे सफाई कामगार झाले आता गुत्तेदार!  स्वच्छता निरीक्षक-मुकादम गायब; मुख्याधिकारी फडसे करताहेत काय?

बीड नगर परिषद चे सफाई कामगार झाले आता गुत्तेदार!

स्वच्छता निरीक्षक-मुकादम गायब; मुख्याधिकारी फडसे करताहेत काय?⋅

बीड (प्रतिनिधी) – बीड नगर परिषद चे सफाई कामगार आता गुत्तेदार झाल्याचा आरोप करत स्वच्छता निरीक्षक आणि मुकादम गायब असल्याने मुख्याधिकारी शैलेश फडसे करताहेत तरी काय? असा प्रश्न बीड शहरवासियांमधून उपस्थित होत असल्याचे मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी म्हटले आहे.

याविषयी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की, यंदा मे महिन्यापासून जोरदार पावसाळा सुरू झाला होता. तेव्हापासून ते आतापर्यंत शहरातील अनेक भागात बीड नगर परिषदेचे सफाई कामगार नाल्या काढत नाहीये. यंदा जोरदार पाऊस झाल्याने सफाई कामगारांचे काम दमदार पावसाने केले. मे महिन्यापासून ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत सातत्याने पडलेल्या जोरदार पावसाने नाल्या खळाळून वाहिल्या. यामुळे सफाई कामगारांनी नाल्या काढल्या नाही. या काळात नाल्या तुंबल्याने जिथे कुठे नागरिकांचे आउटलेट तुंबले चोकअप झाले तिथे याच बीड नगर परिषदेच्या सफाई कामगारांनी खाजगी गुत्तेदारांसारखे गुत्ते घेऊन काम करून देत असल्याचे निदर्शनास आले व सध्या ही येत आहे. मात्र नोव्हेंबर महिन्यापासून पाऊस बंद होऊनही आजपर्यंत सफाई कामगारांकडून बीड शहराच्या अनेक भागातील नाल्या काढल्या जात नाहीये. पावसामुळे सहा महिने आराम केलेल्या सफाई कामगारांना आता बहुतेक काम करण्याची सवय राहिली नसल्याचे यावरून दिसून येते. त्यांची ही सवय मोडावी आणि त्यांनी पुर्ववत काम सुरू करावे याकरिता स्वच्छता निरीक्षक आणि मुकादम यांनी आपले कर्तव्य पार पाडणे अपेक्षित असताना तेही गेल्या आठ महिन्यांपासून गायब झाल्यात जमा आहेत आणि शहरातील नाल्यांसह कुंड्याविना रस्त्यांवर अस्ताव्यस्त पसरलेला कचरा शहराची शोभा वाढवीत आहे. यामुळे मुख्याधिकारी म्हणून शैलेश खडसे करताहेत तरी काय? असा प्रश्न बीड शहरवासीयांमधून उपस्थित होत असल्याचे मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी म्हटले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *