*मिल्लीया गर्ल्स शाळेत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न.*
बीड ( वार्ताहर) बीड येथील मिल्लिया माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत पाचवी ते बारावी वर्गाच्या विद्यार्थिनींची आरोग्य तपासणी करण्यात आली. विशेष करून ही शाळा मुलींची असल्यामुळे मुलींचे आरोग्य उत्तम कसे राखता येईल व मुलींना आरोग्य विषयी जनजागृती कशी करता येईल या उद्देशाने प्रत्येक वर्षी प्रमाणे याही वर्षी जिल्हा शासकीय रुग्णालयामार्फत तज्ञ डॉक्टरांकडून मुलींची आरोग्य तपासणी करण्यात आली यावेळी पाचवे ते बारावीपर्यंतच्या 800 पेक्षा जास्त विद्यार्थीनीची आरोग्य तपासणी करण्यात आली यावेळी शासकीय रुग्णालयाचे तज्ञ डॉक्टर उपलब्ध होते.
या कार्यक्रमात शाळेतील मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक सुपरवायझर व सर्व महिला शिक्षक उपस्थित होते आरोग्य शिबीर उत्कृष्टरित्या संपन्न झाले.


