एशिया न्यूज बीड

कोशिश फाउंडेशनतर्फे करिअर काऊन्सेलिंग कॉन्फरन्सला बीडमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

कोशिश फाउंडेशनतर्फे करिअर काऊन्सेलिंग कॉन्फरन्सला बीडमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद
  • कोशिश फाउंडेशनतर्फे करिअर काऊन्सेलिंग कॉन्फरन्सला बीडमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

 

बीड : कोशिश फाउंडेशनच्या वतीने किंग्स पॅलेस, बीड येथे आयोजित करिअर काऊन्सेलिंग कॉन्फरन्सला विद्यार्थी,पालक आणि शिक्षकांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. तब्बल ५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी या भव्य शैक्षणिक परिषदेत उत्साहाने सहभाग नोंदवला. बीड जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर असे मार्गदर्शनपर शैक्षणिक आयोजन करण्यात आल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.

या परिषदेसाठी भारतभरातील नामांकित व अनुभवी वक्त्यांना आमंत्रित करण्यात आले होते. शिक्षणातील संधी, करिअरचे नवीन क्षितिजे आणि स्पर्धा परीक्षांची दिशा याविषयी प्रभावी सत्रे घेऊन त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कॉन्फरन्समधील पहिले सत्र अ‍ॅड. अहमद खान सर, चेअरमन – बार कौन्सिल महाराष्ट्र-गोवा यांनी घेतले. त्यांनी CLAT (Common Law Admission Test) व कायदा क्षेत्रातील करिअर संधींवर सखोल माहिती दिली. दुसरे सत्र श्री. सिराज शेख, उपाध्यक्ष – टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन उस्मानाबाद यांनी घेतले व CA (Chartered Accountant) क्षेत्रातील मार्गदर्शन केले.

तिसऱ्या सत्रात फरहाना अल्मेल, अकॅडमिक डायरेक्टर – ADCI, NDA Academy पुणे यांनी NDA करिअर व संरक्षण क्षेत्रातील संधींबद्दल विद्यार्थ्यांना दिशा दाखवली.

दुपारनंतरचे अंतिम सत्र काविश फाउंडेशनचे अध्यक्ष शोएब सिद्दीकी व दिल्लीहून आलेले प्रोफेशनल UPSC कोच मोहम्मद यासा सर यांनी संयुक्तपणे घेतले. या सत्रामध्ये MPSC आणि UPSC परीक्षांची सविस्तर माहिती, तयारीची पद्धत आणि अभ्यासाचे धोरण यावर मार्गदर्शन देण्यात आले.

समारंभाचे प्रायोजक डॉ. फिरोज शेख यांनी मुलांना संबोधित त्यांनी कोशिश फाउंडेशनच्या कार्याचा परिचय देत आगामी काळात अशा अनेक उपक्रमांचे आयोजन केले जाईल, असे सांगितले. पुढील टप्प्यात जानेवारी महिन्यात विद्यार्थ्यांसाठी कम्युनिकेशन स्किल वर्कशॉपचे आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.

कार्यक्रमाच्या शेवटी म्हणून आभार प्रदर्शन सय्यद तौसिफ व इंजि. जावेद शेख यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *