उच्चशिक्षित अर्शिया फिरदोस चे संगणक शिक्षण क्षेत्रात पदार्पण
बीड शहरात इन्स्टिट्यूट सुरू करणारी पहिली मुस्लिम संचालिका
बीड (प्रतिनिधी) – शहरातील खासबाग येथील रहिवासी रशीद अहेमद यांची सुकन्या अर्शिया फिरदोस हिने स्वतः उच्च शिक्षण घेत मुला-मुलींसह मोठ्यांना सुद्धा संगणक चे चांगले दर्जेदार शिक्षण मिळावे याकरिता गॅलेक्सी कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट सुरु केले. याची माहिती रशीद शेख यांनी बालपणीचे मित्र मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांना दिली असता त्यांनी गॅलेक्सी कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट ला भेट देऊन आपल्या मित्राच्या मुलीला भरभरून आशीर्वाद दिले तर मित्राचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.
अर्शिया फिरदोस ही ट्रेनर ऑफ कॉम्प्युटर क्लासेस प्रमाणपत्र प्राप्त असून स्टेनोग्राफर ही आहे. याशिवाय सध्या ती बी.फार्मसी चे शिक्षण सुद्धा घेत आहे. एकीकडे शिक्षण क्षेत्रात वेगवेगळ्या पदव्या प्राप्त करत असताना सध्या प्रत्येक क्षेत्रात जवळपास सर्व व्यवहार, शासकीय-प्रशासकीय कार्यालयातील कामे ऑनलाइन होत असल्याने येणारा काळ हा पूर्णपणे संगणकावर अवलंबून राहणार आहे. यामुळे संगणकीय शिक्षणाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढतच जाणार असल्याचे यावेळी बोलताना अर्शिया फिरदोस ने म्हटले. म्हणूनच आपण आपल्या खासबाग येथील गार्डन रोडवरील राहत्या घरासमोर गॅलेक्सी कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट सुरू करून येथे सहा वर्ष वयाच्या विद्यार्थ्यांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सुद्धा संगणकाचे शिक्षण देणार आहोत. याकरिता सकाळी आठ ते दहा या वेळेत सर्वांसाठी इन्स्टिट्यूट सुरू राहील. तर मुलांकरिता स्वतंत्र बॅच ही सकाळी दहा ते दुपारी दोन पर्यंत तसेच मुलींकरिता दुपारी दोन ते रात्री आठ वाजेपर्यंत गॅलेक्सी कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट सुरू राहणार आहे. येथे बेसिक कॉम्प्युटर, एम.एस.सी.आय.टी., बेसिक आणि ऍडव्हान्स टायपिंग, इंग्रजी, मराठी, उर्दू, हिंदी, टेली प्राईम प्लस लेक्चर, डिझाईन अँड कॅन्वा इत्यादी कोर्सेस चे शिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती अर्शिया फिरदोस हिने दिली.
यावेळी आपल्या बालपणीच्या मित्राच्या या मुलीने स्वतः चांगले उच्च शिक्षण घेत गॅलेक्सी कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट सुरू केल्याने बीड शहरात कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट सुरू करणारी मुस्लिम समाजातील पहिली संचालिका ठरल्याने मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी तिचे विशेष कौतुक केले.


