*वक्फ बोर्डाला न्यायधिकारणाचा दिलासा;पोर्टलवर नोंदणी साठी सहा महिने मुदत वाढ*
अध्यक्ष समीर काझी व टीमच्या प्रयत्नांना यश
सीएस नगर(औरंगाबाद)( प्रतिनिधी ) *महाराष्ट्रातील सर्व वक्फ अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या मस्जिद, दरगाह, कब्रस्तान संस्था यांची ‘उम्मीद पोर्टल’ वर नोंदणी वक्फ न्यायाधिकरण कडून मोठा दिलासा मिळाला आहे.अंतिम मुदत आज ५ डिसेंबर २०२५ पर्यंत होती.आता निकाल दिला पासून पुढील सहा महिन्यात उरलेल्या संस्थांच्या मालमत्तांची नोंदणी करता येईल.महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे अध्यक्ष समीर काझी व त्यांच्या टीमचे हे मोठं यश मानले जात आहे.*
आतापर्यंत महाराष्ट्रातील बहुतांश वक्फ संस्थांनी नोंदणी पोर्टलवर झालेली नव्हती त्या मुळे या बाबत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयान्वये वक्फ मंडळाने वक्फ न्यायधिकारणात धाव घेतली होती. मात्र अजूनही काही संस्था नोंदणी करण्याचे राहिलेल्या आहेत. त्यामुळे सबंधित संस्थांचे मुतवल्ली, ट्रस्टीना वेळेत नोंदणी करणे अनिवार्य राहणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने तारीख वाढवून देण्यास नकार दिला असला तरी वक्फ ट्रिब्युनल ( वक्फ न्यायाधिकरण )मध्ये जाण्याची मुभा दिलेली आहे. उम्मीद पोर्टलवर नोंदणीसाठी मुदतवाढ मिळेल असा विश्वास महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी यांनी व्यक्त केला होता. राज्यातील प्रत्येक वक्फ संस्थांची नोंदणी झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असेही अध्यक्ष काझी यांनी सांगितले होते.
….भारतात वक्फ संस्थांच्या नोंदणीत महाराष्ट्र राज्य दुसऱ्या क्रमांकावर आहे. उम्मीद पोर्टलवर वक्फ संस्थांची नोंदणी करण्यासाठी ५ डिसेंबर २०२५पर्यंत मुदत देण्यात आली होती. या कालावधीत महाराष्ट्रातील बहुतांश वक्फ संस्थांनी नोंदणी केली असली तरी रेकॉर्ड उपलब्ध नसणे किंवा इतर कागदपत्रा अभावी अनेकांना नोंदणी करता आली नाही. सर्व कागदपत्र एकाच वेळी उपलब्ध करण्यासाठी अडचणी येत आहेत. त्याचबरोबर उम्मीद पोर्टल वरील तांत्रिक अडचणी देखील त्यासाठी कारणीभूत ठरू लागले आहेत. उम्मीद पोर्टल वरील नोंदणीसाठी मुदतवाढ मिळावी अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने सदरील याचिका फेटाळली मात्र वक्फ ट्रिब्युनल ( वक्फ न्यायाधिकरण) मध्ये जाण्यास मुभा दिली होती. त्यामुळे आता महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाने वक्फ न्यायाधीकरणमध्ये धाव घेऊन यश मिळविले असल्याचे समीर काझी यांनी सांगितले.
*संधीचं सोनं करा,नोंदणीसाठी पुढाकार घ्या-स्मीर काझी*
— *गेल्या पाच डिसेंम्बर २०२५ पर्यंत वक्फ मंडल कडून स्वतः कसोशीने प्रयत्न करण्यात आले,मात्र बहुतांश संस्थाचालक व ट्रस्टी यांनी पुढाकार घेतला नव्हता ,आता न्यायधिकारणाने मुदत वाढवून दिली आहे,म्हणून संधीचं सोनं करण्याची जबाबदारी संस्थाचालक व ट्रस्टी यांची आहे.उमीद अधिनियम २०२५ च्या कला ६१ अन्वये नोंदणी न केल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल,म्हणून आता तरी जागे व्हा.नोंदणी करून घ्या असे आवाहन समीर काझी यांनी केले आहे.*
……वक्फ न्यायधिकारणा कडून दिलासादायक निर्णय देण्यात आला असून सहा महिन्यात जर पोर्टल वर तांत्रिक बिघाड आला,किंवा पोर्टल बंद पडले तर तो कालावधी वाढीव असणार असल्याचे न्यायधिकारणाने आपल्या निर्णयात नमूद केले.


