एशिया न्यूज बीड

क्रांतिकारी शिक्षक संघटनेचा कन्नड व धुळे जिल्ह्यात यशस्वी दौरा* नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या, शैक्षणिक उपक्रमांना प्रोत्साहन**

क्रांतिकारी शिक्षक संघटनेचा कन्नड व धुळे जिल्ह्यात यशस्वी दौरा*  नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या, शैक्षणिक उपक्रमांना प्रोत्साहन**

**क्रांतिकारी शिक्षक संघटनेचा कन्नड व धुळे जिल्ह्यात यशस्वी दौरा*

नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या, शैक्षणिक उपक्रमांना प्रोत्साहन**

क्रांतिकारी शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य यांचा कन्नड (ता. कन्नड) व जिल्हा धुळे येथे व्यापक आणि यशस्वी दौरा नुकताच संपन्न झाला. या दौऱ्यादरम्यान संघटनेने शैक्षणिक विकास, संघटन विस्तार आणि शिक्षक–विद्यार्थी प्रोत्साहन यावर विशेष भर दिला.

कन्नड येथील कुंचखेडा गावातील उमर बिन खत्ताब मदरसा येथे संघटनेच्या शिष्टमंडळाने भेट दिली. मदरसा कॅम्पसमधील मेडिकल कॉलेज, डी.एड., बी.एड., तसेच प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये आयोजित विज्ञान प्रदर्शनात सहभागी विद्यार्थ्यांचे संघटनेतर्फे कौतुक व प्रोत्साहन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण संशोधनात्मक दृष्टिकोनाचे उपस्थित मान्यवरांनी विशेष अभिनंदन केले.

कन्नड येथे झालेल्या संघटनेच्या बैठकीत एकबाल सर यांची औरंगाबाद जिल्हा संघटक, तर एजाज सर यांची धुळे जिल्हा संघटक म्हणून अधिकृत नियुक्ती करण्यात आली. या नियुक्त्यांमुळे संघटनेच्या जिल्हास्तरीय कार्याला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

धुळे येथे पार पडलेल्या बैठकीत संघटनेच्या संघटनात्मक बळकटीसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यामध्ये हबीबुर्रहमान सर यांची राज्य सल्लागारपदी, तसेच आरिफ खान सर यांची राज्य संघटकपदी नियुक्ती जाहीर करण्यात आली.

या दोन्ही ठिकाणी झालेल्या कार्यक्रमांना संघटनेचे संस्थापक सचिव श्री. शाहेद कादरी सर, राज्य उपाध्यक्ष श्री. शफी सर, बीड जिल्हाध्यक्ष श्री. गायकवाड सर, जिल्हा परिषद विभागाचे जिल्हाध्यक्ष पवार सर, उमर बिन खत्ताब मदरशाचे प्राचार्य श्री. बेग सर, तसेच हाफिज सर, शम्सुलहसन सर, जावेद सर, अकील सर, पटेल सर, झुबेर सर व इतर पदाधिकारी व सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या दौऱ्याच्या समारोपप्रसंगी बोलताना संस्थापक सचिव कादरी शाहेद सर यांनी, “क्रांतिकारी शिक्षक संघटना महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात पोहोचवून शिक्षकांच्या हक्कांसाठी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी संघटना सातत्याने कार्यरत राहील,” असा ठाम विश्वास व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *