सिंदफना नदीपात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्यावर कारवाई
दिनांक 23.12.2025 रोजी गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मौजे कुर्ला शिवारातील सिंदफना नदीपात्रामध्ये अवैध वाळू उपसा सुरू आहे. सदर माहितीच्या आधारे PSI काकरवाल, पोह राऊत व पोह गायकवाड यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन छापा कारवाई केली.
छापा दरम्यान एक ट्रॅक्टर रेती भरताना आढळून आला. पोलिसांना पाहताच ट्रॅक्टर चालकाने ट्रॉली नदीपात्रात सोडून ट्रॅक्टरचे हेड घेऊन एरंडगावच्या दिशेने पळ काढला. नमूद स्टाफ यांनी नदीपात्रात त्याचा पाठलाग केला; मात्र आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला.
त्यानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने नदीपात्रात फसलेली ट्रॉली ही तीन ट्रॅक्टर हेडच्या सहाय्याने बाहेर काढून पोलीस स्टेशन येथे आणण्यात आली. चौकशीत घटनास्थळावरून फरार झालेल्या आरोपीचे नाव गणेश हनुमानराव लाखे, रा. एरंडगाव, ता. गेवराई, जि. बीड असे निष्पन्न झाले.
सदर आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन बीड ग्रामीण येथे गुन्हा रजिस्टर नंबर 444/25, कलम 303(2) बीएनएस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्री.नवनीत कॉंवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा पवार, पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज यांचे मार्गदर्शनात PSI काकरवाल, पोह राऊत व पोह गायकवाड यांनी केली आहे.
अवैध वाळू उपशाविरोधात अशीच कठोर कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज यांनी सांगितले आहे.


