*तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत मिल्लिया मुलींची शाळा प्रथम.*
बीड (प्रतिनिधी ) दिनांक.24/12/2025 तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी स्पर्धेचे आयोजन जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत मिल्लिया शाळेत करण्यात आले होते या विज्ञान प्रदर्शनी मध्ये 23 शाळांनी सहभाग घेतला होता प्राथमिक माध्यमिक स्तरावरील शाळांनी यात सहभाग घेतला. बीड तालुक्यातून माध्यमिक स्तरावरून मिल्लिया गर्ल्स माध्यमिक शाळा तालुक्यातून प्रथम आलेली आहे व प्राथमिक स्तरावरील सुद्धा हीच शाळा द्वितीय आली आहे या विजयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
या यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष सलीम बिन मेहफूज सचिव खान सबिहा बाजी यांनी मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक सुपरवायझर व सर्व विज्ञान शिक्षक व शाळेतील सर्व शिक्षकांचे खूप खूप कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


