शेख ज़ाकेर यांच्या अंबर फॅमिली रेस्टॉरंट चे थाटात उद्घाटन
खवय्यांना मिळणार बिर्याणी सह विविध खाद्यपदार्थ एकाच ठिकाणी
बीड (प्रतिनिधी) –
शहरातील ऐतिहासिक कारंजा टॉवर परिसरात असलेल्या अंबर हॉटेलचे संचालक शेख ज़ाकेर यांनी दिनांक १६ नोव्हेंबर २०२५ रविवार रोजी बार्शी रोडवर अंबर फॅमिली रेस्टॉरंट ची थाटात सुरुवात केली. त्यांच्या या नवीन दालनामुळे त्यांनी बनविलेल्या चवदार बिर्याणी सह खवय्यांना आता इतरही अनेक चविष्ट खाद्यपदार्थ एकाच ठिकाणी मिळणार आहे.
शेख ज़ाकेर हे अनेक वर्षांपासून अंबर हॉटेल च्या माध्यमातून एकापेक्षा एक खाद्यपदार्थ बनविण्यासाठी प्रसिद्ध आहेत. हॉटेलमधील खारे आणि गोड पदार्थ तर ते चांगले चवदार बनवितातच शिवाय वेगवेगळ्या प्रकारच्या बिर्याणी बनवण्यातही त्यांचा हातखंडा आहे. यामुळेच लग्न समारंभ असो की इतर कोणतेही कार्यक्रम ते फक्त बीड शहरच नाही तर संपूर्ण बीड जिल्ह्यासह मराठवाडा आणि महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात जाऊन सुद्धा बिर्याणी आणि गोडधोड खाद्यपदार्थ बनवितात. आर्थिकदृष्ट्या अत्यंत सर्वसाधारण कुटुंबातून आलेले शेख ज़ाकेर त्यांच्यात असलेल्या जबरदस्त स्वयंपाक कलेबद्दल सर्व परिचित आणि प्रसिद्ध आहेत. अशा या लोकप्रिय व्यक्तीने आता या व्यवसायात एक पाऊल पुढे टाकून बीड शहरातील बार्शी रोडवर ऐतिहासिक ख़ज़ाना विहिर जवळ अंबर फॅमिली रेस्टॉरंट चे १६ नोव्हेंबर २०२५ रविवार रोजी संध्याकाळी उद्घाटन केले. यावेळी त्यांचे मेहुणे मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी त्यांचे अभिनंदन करत शाल व पुष्पगुच्छ देत हृदयी शुभेच्छा दिल्या. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक रमेशराव गंगाधरे यांची प्रमुख उपस्थिती होती.


