एशिया न्यूज बीड

निवडणुकीकरीता इच्छुक उमेदवारांनी आज राष्ट्रवादी कार्यालयातुन अर्ज घेऊन जावे- शहराध्यक्ष खुर्शीद आलम’*

निवडणुकीकरीता इच्छुक उमेदवारांनी आज राष्ट्रवादी कार्यालयातुन अर्ज घेऊन जावे- शहराध्यक्ष खुर्शीद आलम’*

*निवडणुकीकरीता इच्छुक उमेदवारांनी आज राष्ट्रवादी कार्यालयातुन अर्ज घेऊन जावे- शहराध्यक्ष खुर्शीद आलम’*

बीड(प्रतिनिधी) शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा देशाचे नेते शरदचंद्रजी पवार यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मा. शिंदे साहेब यांचे सुचनेनुसार व बीडचे लोकप्रिय आमदार संदीप भैय्या क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के साहेब व मा.आ. सलीम साहेब यांच्या सूचनेप्रमाणे बीड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक करिता बीड शहरातील नगरसेवक, नगरसेविका व नगराध्यक्ष पदांकरिता निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या जिल्हा कार्यालयातुन उमेदवारी अर्ज आज दि.६ नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता घेऊन जावे असे आवाहन शहराध्यक्ष खुर्शीद आलम यांनी केले आहे.

नगराध्यक्ष, नगरसेवक, नगरसेविका पदाकरिता इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज शरद पवार राष्ट्रवादी पक्ष कार्यालयातूनच नाममात्र शुल्क भरून घ्यावा. पक्ष कार्यालयातून घेतलेला अर्जच ग्राह्य धरण्यात येईल असेही शहराध्यक्ष खुर्शीद आलम यांनी कळवले आहे.

नगरसेवक, नगरसेविका व नगराध्यक्ष पदांकरिता निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांनी आज ६ नोव्हेंबर २०२५ रोजी या कार्यकालात नाममात्र शुल्क भरून अर्ज घ्यावेत. सदरील पक्ष उमेदवारी अर्ज हे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हा कार्यालय बीड येथे उपलब्ध आहेत असे आवाहन राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तथा बीड नगरपरिषदेचे माजी सभापती खुर्शीद आलम यांनी कळवले आहे,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *