केकानवाडीत दारू विक्रीवर कारवाई
किल्लेधारूर दि.५ (प्रतिनिधी):तालुक्यातील केकानवाडी शिवारात विनापरवाना देशी,विदेशी दारूची विक्री करताना गुरुवारी रात्री दोघांना ताब्यात घेत कारवाई करत एकूण १,३२,०५० रुपयांचा मुद्देमाला धारूर पोलिसांनी जप्त केला.
आसरडोह ते आडस रोडवर केकानवाडी शिवारात दिव्या गार्डन अँड रेस्टॉरंट समोर देशी व विदेशी दारू व बियरच्या बाटल्या विनापरवाना आर्थिक लाभाच्या दृष्टीने विकणाऱ्या संजयकुमार आप्पाराव दराडे व बप्पासाहेब शेषराव भांगे रा.वडवणी जि.बीड या दोघांना गुरुवारी रात्री ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून २२ हजार ५० रुपयांचा दारूचा मुद्देमाल व १,१०,००० रुपये किंमतीची युनिकॉर्न गाडी गाडी क्रमांक एमएच ४४ एडी ००३३ असा एकूण १,३२,०५० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला असून यांच्याविरुद्ध पो.हे.काँ जमीर अलाउद्दीन शेख यांच्या तक्रारी वरून गुन्हा दाखल करण्यात आला. असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री.पवार हे करत आहेत.


